शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह यांच्या दालनात शिवसेनेच्या खासदारांना जमण्याच्या सूचना; श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहणार?
2
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
3
ICC Test Rankings: जसप्रीत बुमराह पुन्हा 'नंबर १'! यशस्वी जैस्वाल, विराट कोहलीचीही कसोटी यादीत मोठी झेप
4
शेजाऱ्याने मुलाला केलं किडनॅप, नंतर शोधण्याचं नाटक; खंडणी न मिळताच भयंकर कृत्य अन्...
5
विरोधकांना EVMवर संशय, कोर्टात जायची तयारी; भाजपा नेतृत्वाचे भाष्य, म्हणाले, “लोकसभेवेळी...”
6
भाजपच्या मंत्र्यानं अजान ऐकून थांबवलं भाषण; मंचावरूनच पठण केलं, ‘ला इलाहा इल्लल्लाह…’ 
7
Gautam Adani News : अदानी समूहावर आरोप म्हणजे भारताचा विकासरथ रोखण्याचं षडयंत्र; महेश जेठमलानी बचावासाठी मैदानात
8
२८ चेंडूत १०० धावा! IPL मधील Unsold गड्यानं फास्टर सेंच्युरीसह मोडला रिषभ पंतचा रेकॉर्ड
9
‘इस्कॉन कट्टरतावादी संघटना’, बांगलादेशमधील युनूस सरकारकडून बंदी घालण्याची तयारी  
10
"बाळा, मीच तुझी मम्मा..."; मेकअप केलेल्या आईला ओळखू शकला नाही लेक, ढसाढसा रडला
11
भाजपाने जे ठाकरेंसोबत केले, तसेच आता शिंदेंशी वागतायत का? शिंदे गटाचे नेते म्हणाले...
12
धक्कादायक! महाराष्ट्रातील 'या' मतदारसंघात एका बूथवरील मतमोजणी झालीच नाही
13
एकनाथ शिंदे यांची दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद, मोठा निर्णय जाहीर करणार? 
14
लग्नाचं आमिष दाखवून केलं शोषण, 'पुष्पा 2'मधील अभिनेत्याविरोधात FIR दाखल
15
'बांगलादेशच्या स्वातंत्र्याला धोका...', चिन्मय दास यांच्या अटकेनंतर भारताची तीव्र प्रतिक्रिया; बांगलादेश म्हणाला...
16
मुख्यमंत्री कोण होणार? लवकरच उत्तर मिळेल; देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य
17
काय आहे 'वन नेशन, वन सबस्क्रिप्शन' योजना, कोणाला होणार फायदा?
18
IPL Auction 2025: धडामsss ! मॅक्सवेल ते स्टार्क… ‘या’ ५ बड्या खेळाडूंचा भाव ‘धाडकन्’ कोसळला..!!
19
Enviro Infra Engineers IPO Allotment : एन्व्हायरो इन्फ्रा IPO चं अलॉटमेंट झालीये का? कसं चेक कराल, जाणून घ्या 
20
६ बहिणींचं लग्न, ४ भावांचं शिक्षण; अपघातात मृत्यू झालेल्या डॉक्टरची डोळे पाणावणारी गोष्ट

परभणीत सेनेच्या मोर्चातून शेतकºयांचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 12:29 AM

सिंचनासाठी मूबलक पाणी असताना वीज कंपनी अडवणूक करीत असल्याने अडचणीत सापडलेल्या शेतकºयांच्या प्रश्नांवर शिवसेनेचे खा.बंडू जाधव यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर जन महामोर्चा काढण्यात आला. या मोर्चात जिल्हाभरातील शेतकºयांसह शिवसैनिक सहभागी झाले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : सिंचनासाठी मूबलक पाणी असताना वीज कंपनी अडवणूक करीत असल्याने अडचणीत सापडलेल्या शेतकºयांच्या प्रश्नांवर शिवसेनेचे खा.बंडू जाधव यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर जन महामोर्चा काढण्यात आला. या मोर्चात जिल्हाभरातील शेतकºयांसह शिवसैनिक सहभागी झाले होते.शहरातील शनिवार बाजार येथून दुपारी १ वाजेच्या सुमारास मोर्चाला प्रारंभ झाला. शेतकºयांच्या प्रश्नांबरोबरच जिल्ह्यातील अवैध धंदे, व्यापाºयांचा एलबीटी प्रश्न, महापालिकेने वाढविलेली घरपट्टी, जिल्ह्यातील ठप्प झालेली रोजगार हमी योजनेची कामे अशा विविध मागण्या या मोर्चाच्या माध्यमातून मांडण्यात आल्या. खा.बंडू जाधव यांच्या नेतृत्वाखाली ढोल-ताशाच्या गजरात हा मोर्चा निघाला. शनिवार बाजार, शिवाजी चौक, गुजरी बाजार, गांधीपार्क, अष्टभूजा देवी मंदिर, नारायण चाळ, विसावा कॉर्नरमार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. भगवे रुमाल आणि भगवे झेंडे घेऊन शिवसैैनिक, शेतकरी मोर्चामध्ये सहभागी झाले होते.यावेळी शिवसेनेचे उपनेते लक्ष्मणराव वडले, खा.बंडू जाधव, सहसंपर्कप्रमुख डॉ.विवेक नावंदर, जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव, डॉ.संजय कच्छवे, उपजिल्हाप्रमुख सदाशीव देशमुख, संतोष मुरकुटे, राम खराबे, माणिक पोंढे, प्रभाकर वाघीकर, जि.प. सदस्य विष्णू मांडे, बाळासाहेब जाधव, सूर्यकांत हाके, अतुल सरोदे, संजय सारणीकर, सखूबाई लटपटे, रामप्रसाद रणेर आदींची उपस्थिती होती. मोर्चा जिल्हा कचेरीसमोर आल्यानंतर त्याचे सभेत रुपांतर झाले. यावेळी शिवसेना पदाधिकाºयांनी आपल्या भाषणांमधून भाजप सरकार, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासनावर तोफ डागली. यावेळी वडले, पाटील, डॉ. कच्छवे, आणेराव, डॉ.नावंदर, हाके यांची भाषणे झाली. प्रमुख मार्गदर्शन करताना खा.बंडू जाधव यांनी शेतकºयांचे प्रश्न मांडण्यासाठी प्रशासनाच्याविरुद्ध हा मोर्चा असल्याचे स्पष्ट केले. जिल्ह्यात मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. परंतु, महावितरण कंपनी वेळेवर वीज पुरवठा करीत नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. महावितरणच्या धोरणामुळे सुमारे १५ हजार शेतकरी कृषीपंपाच्या वीज जोडणीपासून वंचित राहिले. राज्य शासनाने विशेष योजनांसाठी विदर्भ आणि संपूर्ण मराठवाड्याला पॅकेज दिले. मात्र परभणी जिल्ह्याला यातून वगळण्यात आले. जिल्ह्यात भाजपाचा आमदार, खासदार नसल्याने दुजाभाव केला जात आहे. हे पैसे मिळाले असते तर ३ हजार वीज जोडण्या सुरु झाल्या असत्या. याच सर्व मुद्यांवर ८ डिसेंबर रोजी महावितरण कार्यालयासमोर आम्ही आंदोलन केले. लोकशाही मार्गाने चर्चा करीत असताना पोलीस प्रशासनाने मात्र आम्हाला गुन्हेगार ठरविले. आमच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले. पोलीस प्रशासनाची भूमिका आडमुठी होती. पोलिसांनी हिंमत असेल तर मटकेवाले, दरोडेखोरांना पकडावे, असे आव्हानही त्यांनी पोलिसांना दिले. खा. जाधव यांनी आपल्या भाषणात पोलीस प्रशासन, मनपा आयुक्त, महावितरणचे अधिकारी आणि जिल्हा प्रशासनातील अधिकाºयांचा खरपूस समाचार घेतला. आम्हाला सन्मानाने वागणूक दिली तर त्यांचा सन्मान करु. मात्र जे आम्हाला खाजवितील त्यांना वाजविले जाईल, असा कडक इशाराही खा. जाधव यांनी दिला.पोलीस ठाण्यांचा लिलाव केलाखा.बंडू जाधव यांनी पोलीस प्रशासनावर कडाडून हल्ला चढविला. मोर्चा अयशस्वी करण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले. परंतु, त्याला दाद न देता हजारो शेतकरी मोर्चात सहभागी झाले. न्याय मागणाºया शेतकºयांना गुन्हेगार ठरविण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. जिल्ह्यात मटका, तितली भवरा असे अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. परंतु, पोलीस प्रशासनातच दोन गट पडले आहेत. जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांचा सर्रास लिलाव केल्याचा आरोप करीत हा सर्व प्रकार आपण मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातला आहे. लवकरच मुख्यमंत्र्यांना भेटून पोलीस प्रशासन आणि महावितरणची सध्याची स्थिती सांगितली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.वीज बिल घोटाळ्यात आयुक्तांवर गुन्हा दाखल करापरभणी महापालिकेच्या पैशांमधून खाजगी लोकांचे वीज बिल भरल्याचा प्रकार समोर आला आहे. जवळपास ७६ लाख रुपयांचा वीज बिल घोटाळा झाला असून या प्रकरणी महानगरपालिकेच्या आयुक्तांविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी खा.जाधव यांनी केली. शहरामध्ये मोठ्या प्रमाणात घरपट्टी वाढविली आहे. एलबीटी प्रकरणातही आयुक्तांनी व्यापाºयांना वेठीस धरले. न्यायालय आणि जिल्हाधिकाºयांचे आदेश न मानता एलबीटीची वसुली केली. इतर महापालिकांच्या तुलनेत परभणीतील व्यापाºयांनी एलबीटीचे दुप्पट पैसे भरले असतानाही मनमानी कारभार करीत व्यापाºयांकडून वसुली सुरु केली आहे. या प्रकरणातही आयुक्तांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे, असे खा.जाधव म्हणाले.