हेमाडपंथी मंदिर व बारवांची दुरवस्था
देवगावफाटा: सेलू तालुक्यातील बोरकीनी, सिमणगाव, ढेंगळी पिंपळगावसह अनेक गावातील पुरातन हेमांडपंथी शिव मंदिर,नृसिंह मंदिर हे जीर्ण झाले असून, बारवची दुरवस्था झाली असून, जिल्हाधिकारी कार्यालयातील पुरातत्व विभागातील अधिकारी यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.
वीटभट्टी व्यवसायाला आली गती
देवगावफाटा : ती मिळत नसल्याने सेलू शहर व ग्रामीण भागातील बांधकाम ठप्प झाले होते; परंतु मोरेगाव व काजळी रोहीना येथील वाळू धक्का प्रशासनाने उपशासाठी मंजूर केला, त्यामुळे बांधकामाने वेग घेतला असून, परिणामी विटांसाठीही मागणी वाढत असल्याने आत्ता वीट बनविण्याच्या व्यवसायाला गती आली आहे.
उज्ज्वला गॅस सिलिंडर मिळेना
देवगावफाटा: वन विभागाच्यावतीने जळतन कमी करून धूरमुक्ती करत वन व्यवस्थापन अंतर्गत पुरवठा विभागाकडून ग्रामीण भागात उज्ज्वला गॅस कनेक्शन मोफत उपलब्ध करून दिले; पण मोफत मिळणाऱ्या सिलिंडरला इतर ग्राहकांप्रमाणेच पैसे मोजावे लागत आहेत. विशेष करून या योजनेचे वितरक हे शहरात असल्याने मागणीप्रमाणे सिलिंडर मिळत नसल्याने पुन्हा चुलीवर स्वयंपाक होताना दिसत आहे.
पारंपरिक पेंटर व्यावसायिक चिंताग्रस्त
देवगावफाटा: आधुनिक पद्धतीने संगणकाद्वारे विविध कलरचे आकर्षक बॅनर मशीनद्वारे कमी वेळेत बनविण्यात येत आहेत. शिवाय किंमतही कमी असल्याने याकडे ग्राहकांचा ओढा वाढत आहे. त्यामुळे विविध रंगाचे डब्बे व ब्रश घेऊन काम करणाऱ्या पेंटरचा व्यवसाय डबघाईला आला आहे. डिजिटल बॅनरने पेंटरचा पारंपरिक व्यवसाय हिरावून घेतल्याने व्यावसायिक चिंताग्रस्त झाले आहेत.