; तहसीलदारांना निवेदन
पालम: तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीने तुरीचे पीक जागेवरच जळून गेले. नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करावेत, या मागणीसाठी ७ डिसेंबर रोजी तालुक्यातील जवळपास ३०० शेतकऱ्यांनी तहसीलदारांना मागणीचे निवेदन दिले असून हेक्टरी ६० हजार रुपये मदतीची मागणी केली आहे.
पालम तालुक्यात या वर्षी खरीप हंगामात अतिवृष्टी झाल्याने कापूस व सोयाबीन पिकाची नासाडी होऊन आर्थिक नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांची मदार तूर पिकावर होती . पण या पिकाला पाण्याचा तडाखा बसला असून जागेवरच पीक वाळून गेले आहे. त्यामुळे तातडीने नुकसानीचे पंचनामे करावेत, शेतकऱ्यांना तूर पिकाचा विमा मंजूर करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी भाजपा राज्य कार्यकारिणी सदस्य गणेशराव रोकडे, उपसभापती अण्णासाहेब किरडे, डॉ. रामराव उंदरे, नागनाथआप्पा खेडकर, मारूती शिंदे, तुकाराम पाटील, प्रल्हाद कऱ्हाळे, मोतीराम खंडागळे, नागोराव कऱ्हाळे, तुकाराम कऱ्हाळे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो: पालम तालुक्यातील तूर पिकाच्या नुकसानीचे पंचनामे करावेत, या मागणीचे निवेदन नायब तहसीलदार गायकवाड यांना देण्यात आले. यावेळी गणेशराव रोकडे, अण्णासाहेब किरडे, डाॅ.रामराव उंदरे, नागनाथ आप्पा खेडकर आदी.