लोकमत न्यूज नेटवर्कमानवत: सिंचन विहिरींच्या प्रस्तावांवर स्वाक्षºया करुनही बनावट स्वाक्षºया केल्याचे ग्रामविकास अधिकाºयाने गटविकास अधिकाºयांना पत्र दिल्याने संतप्त झालेल्या एका शेतकºयाने अंगावर पेट्रोल ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याची घटना १२ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास मानवत येथील पंचायत समिती कार्यालयात घडली.मानवत तालुक्यातील आंबेगाव येथील कालिंदा कारभारी जाधव, तुकाराम नागोराव जाधव, अर्जून किसनराव जाधव, शांताबाई आत्माराम जाधव, कोंडाबाई बाबुराव जाधव, रामचंद्र जाधव या शेतकºयांनी ग्रामविकास अधिकारी के.बी.भोसले यांच्याकडून सिंचन विहिरींच्या प्रस्तावावर ८ मार्च रोजी सह्या घेतल्या होत्या. त्यानंतर या संदर्भातील प्रस्ताव मंजुरीसाठी पंचायत समिती कार्यालयात दाखल केला होता. मात्र १२ मार्च रोजी ग्रामविकास अधिकारी भोसले यांनी संबंधित शेतकºयांच्या विहिरींच्या प्रस्तावांवरील सह्या खोट्या असल्याचे लेखी पत्र गटविकास अधिकारी एस.एच.छडीदार यांना दिले. याबाबतची माहिती या शेतकºयांना समजताच लाभार्थी तुकाराम जाधव हे वयोवृद्ध असल्याने त्यांचा मुलगा आसाराम जाधव व अन्य एका शेतकºयाने बाजार समितीचे उपसभापती पंकज आंबेगावकर यांच्यासह गटविकास अधिकारी छडीदार यांच्या कक्षात जावून त्यांना याबाबत विचारणा केली. यावेळी छडीदार हे त्यांच्याशी चर्चा करीत असताना त्यांचे समाधान झाले नाही. त्यामुळे आसाराम जाधव यांनी हातातील बाटलीमधील पेट्रोल अंगावर ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.यावेळी उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी त्यांना रोखल्याने पुढील अनर्थ टळला. अचानक झालेल्या या प्रकरणामुळे पंचायत समितीमधील अधिकाºयांची भंबेरी उडाली. गटविकास अधिकारी छडीदार यांनी ग्रामविकास अधिकारी भोसले यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे लेखी पत्र दिल्यानंतर उपस्थित शेतकºयांनी त्यांच्या कक्षाचा ताबा सोडला.ग्रामसेवक भोसले यांचा काढला पदभार४पंचायत समिती कार्यालयात अंगावर पेट्रोल ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न झाल्याच्या घटनेची गंभीर दखल घेत गटविकास अधिकारी छडीदार यांनी आंबेगाव येथील ग्रामविकास अधिकारी के.बी.भोसले यांची तडकाफडकी बदली केली असून त्यांचा पदभार ग्रामसेवक सपकाळ यांच्याकडे देण्यात आला आहे. या संदर्भातील आदेश सोमवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास काढण्यात आले.भोसले यांनी केली दिशाभूल: गटविकास अधिकाºयांचा अहवाल४या संदर्भात गटविकास अधिकारी एस.एच.छडीदार यांनी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी बी.पी.पृथ्वीराज यांच्याकडे सोमवारी सायंकाळी अहवाल पाठविला आहे. त्यामध्ये ग्रामसेवक भोसले यांनीच सिंचन विहिरींच्या प्रस्तावावर सह्या केल्या असल्याची माहिती दिल्यानंतर भोसले यांनी त्या सह्या आपल्या नसल्याचे पत्र पंचायत समिती कार्यालयाला दिले. त्यामुळे ते दिशाभूल करीत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची शिफारस छडीदार यांनी सीईओंकडे केली आहे. त्यामुळे या प्रकरणात आता सीईओं पृथ्वीराज काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
परभणी जिल्ह्यात शेतकºयाने अंगावर पेट्रोल घेतले ओतून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 11:19 PM