शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

शेतकऱ्यांनो सावधान; २२ हजार बियाणांच्या शुद्धता तपासणीत तब्बल ४ हजार २५३ नमुने अपात्र

By मारोती जुंबडे | Published: January 25, 2024 12:29 PM

मागील काही दिवसांपासून बियाण्यांसह खतामध्ये भेसळ करून काही विक्रेते व कंपन्या शेतकऱ्यांच्या माथी मारत असल्याचे कृषी विभाग व जिल्हा प्रशासनाकडून केलेल्या कारवाईवरून समोर येत आहे.

परभणी : शेतकऱ्यांना पेरणीसाठी शुद्ध व सर्वाधिक उगवण शक्तीचे बियाणे मिळावे, यासाठी परभणी येथील बीज परीक्षण प्रयोगशाळेत वर्षभरात २२ हजार ४२ बियाणांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ४ हजार २५३ नमुने अपात्र ठरले आहेत. यामध्ये सोयाबीन, तूर, मूग, उडीद, गहू व हरभरा बियाणांचा समावेश आहे.

परभणी येथील बीज परीक्षण प्रयोगशाळेत छत्रपती संभाजीनगर व लातूर विभागातील आठ जिल्ह्यांतून कापूस, सोयाबीन, हरभरा, तूर, मूग, उडीद आदींसह २९ पिकांची बियाणे रब्बी व खरीप हंगामापूर्वी तपासणीसाठी येतात. या प्रयोगशाळेत या बियाणे नमुन्यांचे शुद्धता व उगवण क्षमता तपासणी करण्यात येते. शुद्धतेमध्ये बीज नमुन्याचे आर्द्रता, इतर पिकांची भेसळ, कीडग्रस्त बियाणे तसेच इतर वाणांची भेसळ तपासण्यात येते. कपाशीच्या बीटी वाणांचेसुद्धा तपासणी या प्रयोगशाळेत करण्यात येते. परभणी, लातूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, हिंगोली यासह आठ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या बियाणांची उगवण क्षमता तपासून घेता येते. 

परभणी शहरातील पेडगाव रस्त्यावरील बीज परीक्षण केंद्रात २०२२-२३ या वर्षात २२ हजार ४२ बियाणांचे नमुने तपासण्यासाठी आले होते. त्यातील या केंद्राच्या वतीने २१ हजार ११३ बियाणे नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ४२५३ बियाणांचे नमुने पेरणीसाठी अपात्र ठरल्याची माहिती परीक्षण प्रयोगशाळेचे बीज परीक्षण अधिकारी यू. जी. शिवणगावकर यांनी दिली.

सर्वाधिक साडेनऊ हजार सोयाबीन बीजाचे परीक्षणमागील काही दिवसांपासून बियाण्यांसह खतामध्ये भेसळ करून काही विक्रेते व कंपन्या शेतकऱ्यांच्या माथी मारत असल्याचे कृषी विभाग व जिल्हा प्रशासनाकडून केलेल्या कारवाईवरून समोर येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शुद्ध प्रतीचे व सर्वाधिक उगवण शक्तीचे बियाणे मिळावे, यासाठी परभणी येथील बीज परीक्षण प्रयोगशाळेकडून कार्य केल्या जाते. वर्षभरात २२ हजार ४२ बियाणे नमुने या प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी आले होते. त्यातील ४२५३ बियाणे हे पेरणीसाठी अपात्र ठरले. यामध्ये सर्वाधिक सोयाबीनचे ९४१६ बियाणे तपासणीसाठी या प्रयोगशाळेकडे मिळाले. त्यातील ८६४६ बियाणांची तपासणी करण्यात आली. विशेष म्हणजे सर्वाधिक ३३४० बियाणे हे अपात्र ठरले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीनचे बियाणे घेताना काळजी घ्यावी.

हरभऱ्याचे २७४ नमुने अपात्रखरीप हंगामानंतर येणाऱ्या रब्बी हंगामात सर्वाधिक हरभरा पिकाची पेरणी केली जाते. नगदी पीक म्हणून सध्या परभणी जिल्ह्यातील शेतकरी या पिकाकडे पाहत आहेत. त्यामुळे हरभऱ्याच्या बियाणाला बाजारपेठेत मागणी ही वाढली आहे. परभणी शहरातील बीज परीक्षण केंद्राकडे ४६५९ हरभऱ्याचे नमुने तपासणीसाठी आले होते. त्यातील ४६५९ बियाणांची तपासणी करण्यात आली. परंतु यातील २७४ नमुने हे नापास झाले.

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र