पाथरी शहरातील बेकार मोहल्ला भागातील एका १४ वर्षांच्या मुलीला तिच्या वडिलांनी मंगळवारी घरामध्ये असताना आपल्या मोबाइलमधील अश्लील व्हिडिओ जबरदस्तीने दाखविला. त्यानंतर मुलीवर बलात्कार केला, तसेच घडलेला प्रकार आईला सांगितल्यास तुझ्या आईला फिनाइल पाजून जीवे मारतो, अशी धमकी मुलीला दिली. यानंतर घाबरलेल्या मुलीने घडलेला प्रकार तिच्या आईला सांगितला. त्यानंतर आईने गुरुवारी १२ ऑगस्ट रोजी रात्री पाथरी पोलीस ठाण्यात जाऊन नवऱ्याविरुध्द मुलीवर बलात्कार केल्याचा गुन्हा नोंद केला. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून नराधम आरोपीला मध्यरात्री अटक केली. शुक्रवारी सकाळी आरोपीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर दुपारी आरोपीस पाथरी न्यायालयात हजर करण्यात आले. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
वडिलांनीच केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 4:22 AM