शहरातील नवा मोंढा पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक शैलेश शिवाजी जाधव हे शनिवारी रात्री १० च्या सुमारास एमएच ४४ ई ८३७६ क्रमांकाच्या दुचाकीवरून ड्युटीवरून घरी जात असताना, पोलीस अधीक्षक कार्यालय ते रेल्वेस्टेशन यादरम्यानच्या वळण रस्त्यावर एमएच ११ व्ही ११४१ क्रमांकाच्या ऑटोचालकाने भरघाव वेगाने वाहन चालवून त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात फौजदार शैलेश जाधव हे गंभीर जखमी झाले. उपचारार्थ त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबत शैलेश जाधव यांनी नवा मोंढा पोलीस ठाण्यात ११ जुलै रोजी फिर्याद दिली. त्यावरून एमएच ११ व्ही ११४१ क्रमांकाच्या ऑटोचा चालक काशिब खान रशिद खान याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.
ऑटोच्या धडकेत फौजदार जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 4:20 AM