महावितरणचे कर्मचारी २५ ऑगस्ट रोजी भारस्वाडा येथे अनधिकृत वीज घेणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी गेले होते. या वेळी केलेल्या तपासणीमध्ये आरोपी बन्सीलाल शेषराव भोसले यांनी वीजचोरी केल्याचे कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. तसेच या वेळी केलेल्या तपासणीत भोसले यांनी २ हजार रुपयांची वीज चोरी केल्याचे दिसून आले. त्यांना वीजचोरीचे २ हजार रुपये आणि दंडात्मक ४ हजार २५ रुपयांची भरण्याचे आदेश महावितरणच्या वतीने देण्यात आले. याबाबत पुरेसा वेळ देऊनही बन्सीलाल शेषराव भोसले यांनी सदरील रक्कम भरली नाही. त्यामुळे याबाबत सहायक अभियंता विवेक दिलीप महिंद यांनी २१ सप्टेंबर रोजी नानल पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून बन्सीलाल शेषराव भोसले याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वीजचोरीप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 4:20 AM