शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या
5
अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर पुन्हा एकदा प्रेमात पडली मलायका?, मिस्ट्री मॅनसोबतचा व्हिडीओ व्हायरल
6
'बंडखोरी' रोखण्यासाठी ममता बॅनर्जींनी आपली पकड घट्ट केली; प्रत्येक नेत्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या
7
Stock Market Highlights: सेन्सेक्स-निफ्टीची फ्लॅट सुरुवात, मिडकॅप इंडेक्समध्ये खरेदी; Adani Ports टॉप लूझर
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी
9
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
10
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
11
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
12
तरुणाचा खून, ॲसिड टाकून मृतदेह फेकला; अखेर 'असा' झाला हत्या प्रकरणाचा उलगडा 
13
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
14
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
16
व्यवसाय, बंगला अन् २० एकर फार्महाऊस; मुलीनं दिली जाहिरात 'अस्सा नवरा हवा'
17
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
18
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
19
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
20
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज

जिल्हा बँकेसाठी १५२१ मतदारांची यादी अंतिम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 4:08 AM

परभणी : येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मतदारांची अंतिम यादी २० जानेवारी रोजी अंतिम झाली असून, एक हजार ...

परभणी : येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मतदारांची अंतिम यादी २० जानेवारी रोजी अंतिम झाली असून, एक हजार ५२१ मतदार आता या संस्थेच्या संचालक मंडळ निवडीसाठी मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदविणार आहेत.

परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची मुदत संपल्याने या बँकेची निवडणूक प्रक्रिया घेण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. त्यासाठी मतदार यादी अंतिम करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. मात्र, त्यातच लॉकडाऊन सुरू झाल्याने आहे त्या स्थितीत ही प्रक्रिया थांबविण्यात आली. जानेवारी महिन्यात पुन्हा ही प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय झाला. त्यामुळे प्रारूप मतदार यादीवर आक्षेप नोंदविणे बाकी होते. सहकार विभागाने आक्षेप नोंदविण्यासाठी तीन दिवसांची मुदत दिली होती. प्राप्त झालेल्या आक्षेपांवर सुनावणी पूर्ण करण्यात आली असून, २० जानेवारी रोजी जिल्हा बँकेची अंतिम मतदार यादी घोषित करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी दिली. परभणी आणि हिंगोली अशा दोन जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या या बँकेच्या निवडणूक प्रक्रियेची आता प्रतीक्षा लागली आहे. साधारणत: फेब्रुवारी महिन्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता असल्याने अनेकांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.

शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाची संस्था

ग्रामीण भागातील शेतीशी संबंधित सर्व व्यवहार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून होतात. शेतकऱ्यांचे अर्थसाह्य, दुष्काळी अनुदान यासह विमा रक्कम भरण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातूनच कामकाज पाहिले जाते. त्यामुळे ग्रामीण भागाच्या अर्थकारणाचा दुवा म्हणून या बँकेची ओळख आहे. त्यामुळे ही बँक ताब्यात घेण्यासाठी चांगलीच चुरस निर्माण होते. आता मतदारांची यादी अंतिम झाल्याने इच्छुक उमेदवारांनी निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे.

तीन मतदारसंघांत मतदारांची विभागणी

या बँकेच्या निवडणुकीसाठी तीन मतदारसंघांत मतदारांची विभागणी करण्यात आली आहे. त्यात प्राथमिक कृषी पतपुरवठा, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, संयुक्त शेती संस्था व धान्य अधिकोष सहकारी संस्थांचा मतदारसंघ सर्वांत मोठा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात ९४३ मतदार आहेत. विशेष म्हणजे हे मतदार परभणी आणि हिंगोली या दोन्ही जिल्ह्यांच्या ग्रामीण भागातील आहेत. त्याचप्रमाणे कृषी पणन संस्था व शेतमाल प्रक्रिया संस्थांच्या मतदारसंघात ६४ आणि इतर शेती संस्थांच्या मतदारसंघात ५१४ मतदारांचा समावेश आहे.

प्राथमिक कृषी पतपुरवठा, सेवा सहकारी संस्था, संयुक्त शेती संस्था मतदारसंघात परभणी आणि हिंगोली तालुक्यांत प्रत्येकी ९३, हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यात ८६, सेनगाव तालुक्यात ८० आणि परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यात ८३, जिंतूर ५८, सेलू ४९, पाथरी ३७, मानवत ५६, सोनपेठ ३८, गंगाखेड ६७, पालम ६२, औंढा ६३ आणि वसमत तालुक्यात ७८ मतदारांची नोंद घेण्यात आली आहे.