देवगाव फाटा - सेलू या रस्त्याचा राष्ट्रीय मार्गरस्ता म्हणून सामावेश झाला असून हा २० किमीचा रस्ता अत्यंत खराब झाला होता. जागोजागी खड्डे पडले असल्याने वाहन चालवताना चालकांची मोठी कसरत होत होती. हे २० किमीचे आंतर पार करण्यासाठी जवळजवळ पाऊण तासाच वेळ लागत होता. वाहनधारकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन या रस्त्यावरील डांबरीकरणाचे काम सुरू केले आहे. यासाठी बी.एम.चा ५० एम.एम.चा थर व त्यावर कारपेट थर व साईडपट्याचे भरणा असे या कामाचे स्वरूप आहे. हे काम पूर्ण १५ दिवसात झाल्यानंतर या भागातील महत्त्वाचा रस्ता असलेला देवगाव फाटा - सेलू या रस्त्यावर वाहतुकीसाठी नागरिक,वाहन चालक व वाहनचालकांना ते सोईचे होणार आहे.
अखेर देवगाव फाटा -सेलू रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2020 4:30 AM