महानगरपालिकेच्या वतीने शहरातील प्रभाग समिती अ, ब, क अंतर्गत विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. शनिवारी प्रभाग समिती क अंतर्गत विनामास्क फिरणाऱ्या २६ नागरिकांना प्रत्येकी २०० रुपयांचा दंड लावण्यात आला आहे. प्रभाग समिती क चे सहाय्यक आयुक्त श्रीकांत कांबळे, स्वच्छता निरीक्षक मोहम्मद अब्दुल शादाब, लक्ष्मण जोगदंड, न्यायरत्न घुगे, जय मकरंद, कुणाल भारसाकळे, नागेश उबाळे, प्रमोद उबाळे आदीच्या पथकाने ही कारवाई केली. प्रभाग समिती अ अंतर्गत मुख्य बाजारपेठ तसेच नानलपेठ भागात विनामास्क फिरणाऱ्या ४० जणांना प्रत्येकी २०० रुपयांचा दंड लावण्यात आला. सहाय्यक आयुक्त शिवाजी सरनाईक, मेहराज अहेमद, विकास रत्नपारखे, राजू झोडपे आदीच्या पथकाने ही कारवाई केली. त्याचप्रमाणे शिवाजी चौक ते स्टेशन रोड या भागात विनामास्क फिरणाऱ्या २३ नागरिकांकडून ४ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपायुक्त देविदास जाधव यांच्या नेतृत्वाखाली विनय ठाकूर, श्रीकांत कुरा, मेराज, शेख इस्माईल आदींच्या पथकाने केली.
परभणीत ४० जणांकडून वसूल झाला दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 4:33 AM