लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : बोंडअळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने अनुदान जाहीर केले आहे़ जिल्ह्यात या अनुदानाचा पहिला टप्पा वितरित झाला; परंतु, पुढील टप्प्याची रक्कम मिळाली नसल्याने ५५० गावांमधील शेतकरी बोंडअळीच्या अनुदानापासून वंचित आहेत़२०१६-१७ च्या खरीप हंगामामध्ये बोंडअळीचा मोठा प्रादुर्भाव झाला होता़ त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे २ लाख हेक्टरवरील कापसाचे नुकसान झाले़ त्यामुळे शेतकºयांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले़ या शेतकºयांना नुकसान भरपाई देण्याचे राज्य शासनाने जाहीर केले़ महसूल प्रशासनाने बोंडअळीग्रस्त भागाचे पंचनामे करून शासनाकडे नुकसानीचा अहवाल पाठविला होता़ या अहवालानंतर राज्य शासनाने बोंडअळीग्रस्त शेतकºयांना तीन टप्प्यात अनुदान वाटप केले जाईल, असे जाहीर केले़ त्यानुसार जिल्ह्यासाठी ४२ कोटी रुपयांचे अनुदान प्राप्त झाले होते़ महसूल प्रशासनाने शेतकºयांच्या यादीनुसार अनुदानाचे वाटप केले़ परभणी जिल्ह्यात ८४८ गावे असून, या सर्व गावांमध्ये बोंडअळीने कापसाचे नुकसान झाले आहे़ त्यामुळे सर्वच्या सर्व लाभार्थ्यांना अनुदान मिळणे अपेक्षित आहे़ जिल्हा प्रशासनाला ४२ कोटी रुपयांचा पहिला टप्पा प्राप्त झाल्या नंतर प्रशासनाने अनुदान वाटपास प्रारंभ केला़ ८४८ पैकी २९८ गावांमध्ये बोंडअळीचे अनुदान वाटप झाले आहे़ अनुदान वाटपाचा अहवालही राज्य शासनाकडे पाठवून एक महिन्याचा कालावधी उलटला़ परंतु, दुसरा टप्पा अद्यापपर्यंत प्राप्त झाला नाही़---१५७ कोटींची केली मागणीमहसूल प्रशासनाने बोंडअळीग्रस्त कापूस पिकाचे पंचनामे केल्यानंतर जिल्ह्यासाठी १५७ कोटी रुपये नुकसान भरपाईची मागणी केली होती़ विशेष म्हणजे शासनाने ही मागणी मंजूरही केली आहे़ तीन समान टप्प्यात अनुदान वितरित केले जाईल़ पहिला टप्पा प्राप्त झाल्यानंतर संबंधित गावांतील सर्व शेतकºयांचे अनुदान वाटप करावे, अशा पद्धतीने टप्प्या टप्प्याने सर्व शेतकºयांना अनुदान वाटप करावे, अशा सूचना दिल्या होत्या़ त्यानुसार पहिल्या टप्प्यात २९८ गावांमधील शेतकºयांना अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे़८६ हजार शेतकºयांनाच लाभपरभणी जिल्ह्यात बोंडअळीने कापसाचे नुकसान झालेल्या शेतकºयांची संख्या ३ लाख ५१ हजार १४८ एवढी आहे़ या शेतकºयांना नुकसानीपोटी १५७ कोटी रुपयांचे अनुदान आवश्यक आहे़ प्रत्यक्षात ४२ कोटी रुपयेच प्राप्त झाले असून, ८६ हजार ७४३ शेतकºयांनाच हे अनुदान वितरित करण्यात आले आहे.
परभणी जिल्ह्यातील साडेपाचशे गावे मदतीपासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 12:51 AM
बोंडअळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने अनुदान जाहीर केले आहे़ जिल्ह्यात या अनुदानाचा पहिला टप्पा वितरित झाला; परंतु, पुढील टप्प्याची रक्कम मिळाली नसल्याने ५५० गावांमधील शेतकरी बोंडअळीच्या अनुदानापासून वंचित आहेत़
ठळक मुद्देबोंडअळीचे अनुदान : दुसरा टप्पा रखडल्याचा परिणाम