तालुका विधी समिती व वकील संघाच्यावतीने २३ जानेवारी रोजी वाहतूक सुरक्षा नियम व चिन्ह जनजागृती करण्यासाठी पोलीस ठाण्यात आयोजित केलेल्या जनजागृती कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमास पोलीस उपअधीक्षक राजेंद्र पाल, पोलीस निरीक्षक रमेश स्वामी, महामार्ग पथक प्रमुख प्रकाश कुकडे, वकील संघाचे ॲड. सुनील जाधव, ॲड. अनिरुद्ध पांडे, पोलीस उपनिरीक्षक नागनाथ तुकडे, पोलीस उपनिरीक्षक लोकलवार, ॲड. अनिरुद्ध काळे, ॲड. यशपाल पंडित, ॲड. अरुण गोलाईत उपस्थित होते. न्या. गोरे म्हणाले, वाहनचालक वाहतूक शाखेने घालून दिलेल्या नियम व अटींचे पालन करताना दिसून येत नाहीत. परिणामी, अपघातांची संख्या वाढली आहे. या अपघातात जीवितहानीही मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे रस्त्यावरून वाहन चालवताना सर्वांनीच वाहतूक शाखेने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन केले. यावेळी महामार्ग शाखेचे पथक प्रमुख प्रकाश कुकडे यांनी वाहतूक नियमांची माहिती सांगितली. ॲड. मुकुंद पाटील यांनी सूत्रसंचालन केले.
अपघात टाळण्यासाठी वाहतूक नियमांचे पालन करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2021 6:02 AM