शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
2
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
3
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
4
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
5
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
6
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
7
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
8
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
9
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
10
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
Daily Top 2Weekly Top 5

पाथरीचे माजी आमदार बाबाजानी दुर्राणींना धक्का; एसआयटी चौकशीची मंत्री बावनकुळेंची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 15:37 IST

अधिवेशनात काँग्रेसचे आमदार साजिद पठाण यांच्या लक्षवेधीला उत्तर देताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

पाथरी ( परभणी) : माजी आमदार बाबाजाणी दुर्राणी यांच्या बाबा टॉवरमधील बेकायदेशीर बांधकाम तसेच सर्व्हिस रोड आणि ओपन स्पेसवर अतिक्रमण करून करण्यात आलेल्या बांधकाम प्रकरणावर काँग्रेसचे आमदार साजिद पठाण यांनी लक्षवेधीद्वारे कारवाईची मागणी केली. यावर उत्तर देताना राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माजी आमदार दुर्राणी यांच्या बाबा टॉवर या प्रकरणासह इतर 30 प्रकरणात एसआयटी चौकशीची घोषणा केली आहे.

पाथरी येथील सर्वे न (9/01 ) पाथरी गृहनिर्माण संस्थेच्या  8 हजार 800 चौ मीटर  जागेत लेआउटला 5 हजार 177 चौ मीटर प्लॉटिंग आणि 21 87 चौ मीटर रोड नाली साठी  1984 मध्ये सहायक संचालक नगररचना परभणी यांनी मान्यता दिली  होती. मूळ रेखांकनामध्ये 24 प्लॉट व सदस्यसंख्या होती यात पाथरी मानवत रस्त्यावर 12 मीटर सर्व्हिस रोड आणि 10 टक्के म्हणजे 896 चौ मीटर मोकळी जागा प्रस्तावित होती. त्यानंतर 21 जानेवारी 2004 ला नगररचना विभागाची परवानगी न घेता तत्कालीन मुख्याधिकारी यांनी बेकायदेशीररित्या नवीन रेखांकनास मान्यता दिली होती. 

2010 मध्ये माजी आमदार दुर्राणी यांनी गृहनिर्माण संस्थे मध्ये निवासी भूखंड विकसित न करता शॉपिंग कॉम्प्लेक्सचे काम सुरू केले म्हणजेच गृहनिर्माण संस्थेच्या जागेत बेकायदेशीररित्या वाणिज्य वापरासाठी बांधकाम करण्यात आले.  त्यानंतर 2013 मध्ये नगर परिषदेने दिलेल्या सुधारित बांधकाम परवानगीच्या अटी आणि शर्तीचा भंग झाला. या प्रकरणात 2015 मध्ये प्रथम तक्रार दाखल झाली. यात तत्कालीन उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील यांनी चौकशी करून बाबा टॉवरचे बांधकाम बेकायदेशीर असल्याने संस्था अध्यक्ष सचिव आणि तत्कालीन मुख्याधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असा अहवाल 8 जुलै 2015 रोजी परभणी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला होता.

त्यानंतर 2022 मध्ये शासनाच्या आदेशानुसार या प्रकरणी विभागीय आयुक्त यांच्या मार्फत चौकशीचे आदेश दिले गेले. या प्रकरणात 16 जानेवारी 2023 रोजी अप्पर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली होती. या समितीने देखील सर्व्हिस रोडवर नगर परिषदेची कोणतीही परवानगी न घेता अतिक्रमण करून 15 दुकाने बेकायदेशीर बांधकाम केल्याचा आणि ओपन स्पेसवरही बांधकाम केल्याचा अहवाल दिला होता. या प्रकरणात पुढे शासनाकडून मात्र कारवाई झाली नव्हती.

तब्बल ३० तक्रारींची चौकशीदरम्यान, अकोला येथील काँग्रेसचे आमदार साजिद पठाण यांनी याच प्रकरणात कारवाईची मागणी करत अधिवेशनामध्ये लक्षवेधी मांडली होती. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बाबा टॉवरमधील बेकायदेशीर बांधकाम आणि माजी आमदार दुर्राणी यांच्या विरोधातील इतर जवळपास ३० तक्रारींची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची घोषणा अधिवेशनात केली.

टॅग्स :parabhaniपरभणीChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेEnchroachmentअतिक्रमण