यंदा जून महिन्यापासून निम्न दुधना प्रकल्पात पाण्याची आवक सुरू झाली आहे. ऑगस्ट महिन्यात प्रकल्प शंभर टक्के भरला होता; परंतु ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात वारंवार निम्न दुधना प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्याने दुधना प्रकल्पाच्या पाणीपातळीत वेगाने पाणीसाठा निर्माण होत आहे. परिणामी प्रकल्पात येणारे अतिरिक्त पाणी सोडले जात आहे. शुक्रवारी रात्री आणि शनिवारी सकाळी पुन्हा एकदा जालना जिल्ह्यात जोरदार पाऊस पडला. त्यामुळे प्रकल्पाच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. परिणामी, शनिवारी दुपारी प्रकल्पाचे १४ दरवाजे ०.६० मीटरने उचलून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग केला जात आहे. त्यामुळे मोरेगाव येथील दुधना नदीच्या पुलावरून पाणी वाहत आहे, तसेच सेलू- वालूर रस्त्यावरील राजवाडीजवळील पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे दोन्ही मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
निम्न दुधना प्रकल्पाचे चौदा दरवाजे उघडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 4:20 AM