शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

योजनेच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 4:16 AM

कोरोना कालावधीत ज्या कुटुंबातील कर्त्या व्यक्तींचे निधन झाले आहे, अशा कुटुंबातील विधवा महिलेला पन्नास हजार रुपये अनुदान जिजामाता/ जिजाऊ ...

कोरोना कालावधीत ज्या कुटुंबातील कर्त्या व्यक्तींचे निधन झाले आहे, अशा कुटुंबातील विधवा महिलेला पन्नास हजार रुपये अनुदान जिजामाता/ जिजाऊ या योजनेंतर्गत महिला व बालविकास विभागाच्या वतीने देण्यात येणार असल्याचे खोटे मेसेज मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले आहेत. प्रत्यक्षात अशी कुठल्याही प्रकारची योजना या विभागाची नाही, असे जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.कैलास घोडके यांनी स्पष्ट केले आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले की, पूजा रमेश पाटील आणि पूजा आकाश ठक्कर या महिलांच्या नावाचा दूरध्वनी क्रमांक देऊन सदरची योजना चालू असल्याचे भासविले जात आहे, तसेच जास्तीतजास्त लोकांनी फायदा घ्यावा, अशा खोट्या बातम्या पसरविल्या जात आहेत. एखाद्या विभागाची योजना अस्तित्वात आल्यानंतर, त्याबाबत शासन निर्णय होऊन महाराष्ट्र शासनाच्या वेबसाइटवर प्रसिद्ध केला जातो. त्यानंतर, ती योजना अस्तित्वात येते. त्याबाबत जिल्हास्तरावरील त्या विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत सदर योजनेचा प्रचार प्रसार केला जातो. त्यामुळे अशा फसव्या अमिषाला बळी पडू नये, असे ते म्हणाले.

‘जिजामाता/जिजाऊ योजनेबाबत कार्यालयात येऊन काहींनी विचारणा केली, तर काही जणांचे दूरध्वनी येत आहेत. या विभागाची अशा प्रकारची कोणतीही योजना अस्तित्वात नसताना, कार्यालयाला लोकांचे समुपदेशन करण्यासाठी आपला वेळ खर्ची घालावा लागत आहे. अशा भूलथापांना कोणीही बळी पडू नये.

- डॉ.कैलास घोडके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, परभणी