थॅलसेमिया सपोर्ट ग्रुप आणि संकल्प फाैंडेशनच्यावतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यभरातील रुग्णांसाठी शुक्रवारी परभणी येथे हे शिबिर होत आहे. सुमारे ८० कुटुंबांतील आई-वडील, बहीण-भाऊ यांची मोफत तपासणी केली जाणार आहे. शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमास जिल्हाधिकारी आंचल गोयल, जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
रक्त विकार तज्ज्ञ डॉ. मनोज तोष्णीवाल, डॉ. अर्चना शहा, डॉ. प्रसाद मगर हे तपासणी करून मार्गदर्शन करणार आहेत. या शिबिराचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन थॅलसेमिया सपोर्ट ग्रुपचे लक्ष्मीकांत पिंपळगावकर यांनी केले आहे.