या शिबिराचे उद्घाटन जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या हस्ते झाले. यावेळी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर सुरवसे, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या जिल्हा समन्वयक मीनाक्षी पद्मे, डॉ. काजे, डॉ. विनोद कुमार, डॉ. रेणू पांडे, डॉ. संध्या राठोड, आदींची उपस्थिती होती. यावेळी श्रवण दोष, बोलता न येणे, अडखळणे तसेच मुला-मुलींची नेत्र दोष तपासणी आदींबाबत एकूण २४० मुला-मुलींची तपासणी करण्यात आली. यापूर्वीही रुग्णालयात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत बालहृदय रोग तपासणी व शस्त्रक्रिया, बोबडेपणावर शस्त्रक्रिया शिबिर, आदी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यापुढेही राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत आदी योजनांच्या माध्यमातून हा उपक्रम पुढे चालू ठेवण्याचा मानस रुग्णालयाचे संचालक डॉ. प्रफुल्ल पाटील, संचालिका तथा मनपा सदस्या डॉ. विद्याताई प्रफुल्ल पाटील यांनी बाेलून दाखविला.
मोतीबिंदू, तिरळेपणावर मोफत तपासणी शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 4:16 AM