यावेळी डाँ. संजय रोडगे, हभप. सारंगधर महाराज रोडगे, जि. प. सभापती रामराव उबाळे, राजेंद्र लहाने, पुरुषोत्तम पावडे, चंद्रकांत गाडेकर, अँड. बालासाहेब रोडगे, सुधाकर रोकडे, दिपक रोडगे, आप्पासाहेब रोडगे आदींची उपस्थिती होती. गावाचा विकास करावयाचा असेल तर गावात विविध योजनेतून विकास कामे झाली पाहिजेत. सर्वसामान्य नागरीकांना त्रास होणार नाही याची दक्षता ग्रामपंचायतने घेतली तर निश्चित नागरिक कुठलीही अपेक्षा न करता आपल्या सोबत राहतील. ग्रामिण विकास निधी अंतर्गत २५/१५ च्या निधीतून सिमेंट रस्ता ,नाली बांधकाम तसेच पेव्हर ब्लाँकच्या कामासाठी १५ लाख रुपयाचा निधी रवळगाव ग्रामपंचायतला दिला आसुन काम चांगल्या प्रतीचे झाले पाहिजे असे यावेळी भांबळे म्हणाले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनंता रोडगे, तुकाराम रोडगे, हरिभाऊ रोडगे, गजानन रोडगे, भरत रोडगे, शिवाजी रोडगे, राजेभाऊ रोडगे, गोविंद भदर्गे आदींनी पुढाकार घेतला.
विकास कामासाठी निधी कमी पडू देणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 4:22 AM