गंगाखेड (परभणी ) : नवीन विद्युत मीटर घेण्याकरिता लागणारे सर्व्हे रिपोर्ट देण्यासाठी ३८०० रुपयांची लाच घेतांना महाराष्ट्र वीज वितरण कंपनीच्या लाईनमॅनला लाच लुचपत विभागाच्या पथकाने सापळा लावुन जेरबंद केले आहे. ही कार्यवाही सारडा कॉलनी परिसरात करण्यात आली आहे.
शहरातील सारडा कॉलनी परिसरातील वीज ग्राहकास नवीन विद्युत मीटर घेण्याकरिता लागणारे सर्व्हे रिपोर्ट देण्यासाठी लाईनमॅन योगेश सुभाष मुंढे ( वय २६ वर्ष रा. सारडा कॉलनी, गंगाखेड) याने ३८०० रुपयांची मागणी केली. काम करून घेण्यासाठी लाच देण्याची इच्छा झाली नसल्याने तक्रारदाराने वीज ग्राहकाने यासंबंधी परभणी येथील लाच लुचपत प्रतिबंधक कार्यालयात तक्रार नोंदविली
यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक संजय लाटकर, अप्पर पोलीस अधीक्षक नुरमहम्मद शेख, पोलीस उपअधीक्षक गजानन विखे यांच्या मार्गदर्शनाखाली सारडा कॉलनी परिसरात पो.नि. अनिल गव्हाणकर, पो.नि. विवेकानंद भारती, जमादार हनुमंते, जमादार लक्ष्मण मुरकुटे, पो.ना. अनिल कटारे, पो.शि. अविनाश पवार, सचिन गुरसूडकर, धबडगे, चौधरी, बोके, पो.ना. शेख मुखीद, चट्टे, मपोशि. टेहरे आदींनी सापळा रचून मुंडे यास रंगेहाथ पकडले.