या मार्गावर सर्वाधिक ट्रॅव्हल्स धावतात
परभणी-पुणे ३५ बसेस
परभणी-मुंबई ३ बसेस
परभणी-नागपूर ७ बसेस
परभणी-कोल्हापूर १ बस
भाडे वाढले
परभणी-पुणे १ हजार ८००
परभणी-मुंबई १४०० १२००
परभणी-नागपूर १ हजार ८००
परभणी-कोल्हापूर १ हजार ८००
दोन वर्षांनंतर बरे दिवस
मागील दीड-दोन वर्षांपासून सर्व व्यवसायाप्रमाणे ट्रॅव्हल्स व्यवसायालाही कोरोनाचा फटका बसला होता. जवळपास एक वर्ष सर्व ट्रॅव्हल्स जागेवरच होत्या. या काळात दुकान भाडे, चालकाचा पगार, ट्रॅव्हल्सची देखभाल दुरुस्ती यासह अन्य खर्च सुरूच होते. मात्र, उत्पन्न नव्हते. मागील तीन महिन्यांत हा पहिलाच सिझन प्रवाशांमुळे मिळाला. यात काहीशी दरवाढ सर्वांसोबत करावी लागली. पेट्रोल-डिझेलचे दर वाढल्याचा परिणाम आहे.
-ट्रॅव्हल्समालक
परभणीकडे गणपती व महालक्ष्मी काळात येणाऱ्यांची संख्या अधिक असते. यात येताना आणि जाताना, अशा दोन्ही फेऱ्यांची भाडेवाढ केल्याचे दिसते. प्रत्यक्षात दोन फेऱ्या जुन्याच दराने व प्रवासी नसल्याने रिकाम्या माराव्या लागत आहेत. याचा फटकासुद्धा भरून निघत नाही.
-ट्रॅव्हल्स चालक
प्रवाशांना फटका
पुणे जाण्यासाठी एसी-नाॅनएसी सर्व दर जवळपास २०० रुपयांनी वाढले आहेत. यात एका कुटुंबाला जवळपास जाण्यासाठी ३ ते ४ हजार लागत आहेत. ही दरवाढ कमी करण्याची मागणी होत आहे.
-पीयूष आगलावे
सणासुदीच्या काळात ऐनवेळी रेल्वेचे आरक्षण मिळत नाही. याचा फायदा ट्रॅव्हलवाले घेतात. नेहमीच ही परिस्थिती उद्भवत आहे. या दरांवर नियंत्रण असणे गरजेचे आहे.
-सोपान पाटील