मन हलके करणे हाच उपाय
घरातील सदस्यांनी एकमेकांसोबत वेळ घालविताना जास्तीत जास्त चांगला संवाद कसा घडेल, याकडे लक्ष द्यावे. घरी राहून वेळ जात नसल्याने वाचन, संगीत एकणे, एखादा आवडीचा छंद जोपासणे यासारख्या बाबींमध्ये मन गुंतवावे. सोशल मीडियाचा वापर कमी करावा, तसेच नकारात्मक विचारांपासून दूर राहावे. घरातील सदस्यांच्या आवडीनिवडी ओळखून त्यांच्याशी सुसंवाद साधावा.
या प्रकारांमध्ये झाली वाढ
लहान मुलांचे चिडचिड करणे वाढले.
आई-वडिलांशी उलटे बोलणे, उद्धटपणे उत्तर देणे.
तरुणांमध्ये व्यसनाधीनता वाढली.
एकत्रित राहण्यातून व जास्त वेळ सहवास होत असल्याने पती-पत्नीतील प्रेमभावना कमी झाली.
आई-वडिलांच्या किरकोळ भांडणाचा परिणाम लहान मुलांवर होत आहे.
मानसोपचार तज्ज्ञ म्हणतात...
परभणी शहरात मानसिक स्वास्थ्य बिघडले म्हणून समुपदेशन करण्यासाठी येणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. यात सर्वच वयोगटांतील नागरिकांना कमी-अधिक प्रमाणात ही समस्या जाणवत आहे. यात काही जणांना समुपदेशन तर अस्वस्थता वाढल्यास औषधींची मात्रा द्यावी लागत आहे. याकरिता ताणतणाव न घेता आहे त्या परिस्थितीत प्रत्येकाने आनंदी जीवन जगावे.
- डाॅ. जगदीश नाईक, मानसोपचार तज्ज्ञ