लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहराला पाणीपुरवठा करणाºया राहटी बंधाºयात दाखल झालेल्या पाण्याच्या दाबामुळे बंधाºयाचे एक गेट तुटून पाणी वाहून गेले आहे़ दरम्यान, ही बाब लक्षात येताच महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने तातडीने पाटबंधारे विभागाला माहिती दिली़ त्यानंतर बुधवारी दिवसभर दुरुस्तीचे काम करण्यात आले़परभणी शहराला राहटी येथील बंधाºयातून पाणीपुरवठा केला जातो़ यावर्षी जिल्ह्यात पाण्याचा मुबलक साठा असला तरीही ऐन हिवाळ्यातच बंधाºयातील पाणीसाठा संपला़ बंधाºयातील पाणी कमी होत असल्याने महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने १३ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकाºयांना पत्र पाठवून परभणी शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी एक दलघमी पाण्याची मागणी नोंदविली होती़ जिल्हाधिकाºयांच्या आदेशानुसार पूर्णा पाटबंधारे विभागाने सिद्धेश्वर धरणातून परभणी शहरासाठी १ दलघमी पाणी सोडले़ हे पाणी १९ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजता बंधाºयात दाखल झाले़वेगाने पाणी बंधाºयात येत असल्याने या बंधाºयांच्या दरवाजांपैकी एका दरवाज्याच्या प्लेट पाण्याच्या वेगामुळे उखडल्या़ त्यामुळे या प्लेटमधून पाणी वाहून गेले़ ही बाब मनपा कर्मचाºयांच्या निदर्शनास आल्यानंतर तातडीने त्याच दिवशी मंगळवारी सायंकाळी ६़३० वाजेच्या सुमारास जिल्हाधिकाºयांसह पाटबंधारे विभागालाही माहिती देण्यात आली़बुधवारी राहटी बंधाºयातील प्लेटच्या दुरुस्तीचे काम पाटबंधारे विभागाच्या कर्मचाºयांनी हाती घेतले़ हे काम दिवसभर चालले़ दरम्यान, बंधाºयातील पाणी वाहून गेल्याने परभणी शहरवासियांना नियमित पाणीपुरवठ्यासाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे़
गेट तुटल्याने पाणी गेले वाहून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 12:25 AM