शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दुकानदारांनाही मिळणार पेन्शन? योजना या वर्ष अखेरीस सुरू होण्याची शक्यता
2
वक्फबाबत सुप्रीम कोर्टाचे अंतरिम आदेश; अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
3
मुंबईचा फलंदाज बाद झाला, माघारी परतत असतानाच तिसऱ्या पंचांना दिसली यष्टीरक्षकाची घोडचूक, मग...
4
ठाणे: पट्टे, रॉड अन् बांबूने लहानग्यांना मारहाण, बालआश्रमातील वास्तव; ४ मुलींवर झाले अत्याचार
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२५: धन व कीर्ती यांची हानी संभवते
6
'टी. एन. शेषन यांनी मागितले होते गृहमंत्रिपद', माजी राज्यपालांच्या पुस्तकात खळबळजनक दावा
7
ठाण्यातील १,३०० झाडांवर कुऱ्हाड चालविण्याचा विकासकाचा ‘डाव’, वृक्षांचे वय लपवल्याचे वनविभागाच्या पाहणीत उघड
8
"इंडस्ट्रीतील प्रत्येक महिलेसोबत त्याचे शरीरसंबंध...", अमृता रावची बहीण प्रीतिकाचे टीव्ही अभिनेत्यावर गंभीर आरोप
9
समृद्धी महामार्गावरून मेपासून जा सुसाट; मुंबई ते नागपूर केवळ आठ तासांचा प्रवास
10
मध्य रेल्वेवर रविवारी खोळंबा, सीएसएमटी-विद्याविहारदरम्यान पाच तासांचा मेगाब्लॉक
11
विशेष लेख : बाळासाहेब ठाकरे नाशिकहून ‘लाइव्ह’..., आपल्या नेत्यांचे विचारच बदलायचे?
12
मुंबईतील ३६ विधानसभांसाठी भाजपचे १०८ मंडल अध्यक्ष, कोअर कमिटीच्या बैठकीत आज होणार शिक्कामोर्तब
13
वक्फ मालमत्तांचा दर्जा ५ मेपर्यंत रद्द होणार नाही; केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयाला हमी
14
अग्रलेख: तुही भाषा कंची? अशी सक्ती करायचे कारण नाही
15
शेअर बाजाराचा चौकार, ६.३७ टक्क्यांनी वाढला सेन्सेक्स; सलग चौथ्या दिवशी बाजारात वाढ
16
चार मुलींचा स्कूल बसमध्ये लैंगिक छळ, स्कूल बसच्या क्लिनरविरोधात गुन्हा दाखल
17
"न्यायालये राष्ट्रपतींना कालमर्यादा आखून देऊ शकत नाहीत; ‘सुपर पार्लमेंट’सारखे वागू नये"
18
महेश मांजरेकर यांना व्ही. शांताराम जीवन गौरव, भीमराव पांचाळे, अनुपम खेर, काजोल, मुक्ता बर्वेंचा सन्मान
19
NASHIK FIRE BREAKING VIDEO: नाशिकमध्ये अग्निकल्लोळ! प्लायवूड फॅक्टरीला भीषण आग; १८ बंब पोहोचले, तरीही...
20
परत पदावर येऊन धनंजय मुंडेंच्या हातून समाजसेवा घडावी; नामदेवशास्त्रींचे विधान, जरांगे भडकले

गौरवास्पद ! येलदरीचा जलविद्युत प्रकल्प झाला ५२ वर्षांचा; अखंडितपणे वीजनिर्मिती सुरू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 14:41 IST

Yeldari Dam, Yeldari Hydropower Project : देशाचे तत्कालीन गृह तथा वित्तमंत्री व राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत शंकरराव चव्हाण यांच्या दूरदृष्टीतून जिंतूर तालुक्यातील येलदरी येथे पूर्णा नदीवर धरण उभारण्यात आले.

ठळक मुद्देयेलदरी प्रकल्पावर १ जानेवारी १९६९ रोजी जलविद्युत प्रकल्पाची उभारणी झाली. धरणातील एकूण ९३४ दशलक्ष घनमीटर पाणीसाठ्यातून ५९ दशलक्ष युनिट विजेची निर्मिती

येलदरी (जि. परभणी) : जिंतूर तालुक्यातील येलदरी धरणावर उभारण्यात आलेल्या जलविद्युत प्रकल्पाला १ जानेवारी रोजी ५२ वर्षं पूर्ण होत असून, या प्रकल्पातून आतापर्यंत शेकडो मेगावॉट विजेची निर्मिती झाली आहे. यातून शासनाला कोट्यवधी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. अखंडितपणे सुरू असलेल्या या प्रकल्पाचा शुक्रवारी (दि.१) वर्धापनदिन आहे.

देशाचे तत्कालीन गृह तथा वित्तमंत्री व राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत शंकरराव चव्हाण यांच्या दूरदृष्टीतून जिंतूर तालुक्यातील येलदरी येथे पूर्णा नदीवर धरण उभारण्यात आले. या धरणाच्या पाण्यामुळे परभणी, हिंगोली व नांदेड जिल्ह्यातील ६० हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली आली आहे. तसेच या तिन्ही जिल्ह्यांतील २३२हून अधिक गावे पिण्याचे पाणी येलदरीतून घेतात. याच येलदरी प्रकल्पावर १ जानेवारी १९६९ रोजी जलविद्युत प्रकल्पाची उभारणी झाली. येलदरी धरणात एकूण ९३४ दशलक्ष घनमीटर एवढा पाणीसाठा होतो. त्यापासून ५९ दशलक्ष युनिट इतक्या विजेची निर्मिती होते. हे धरण आतापर्यंत ३० ते ३५ वेळा भरले आहे. त्यातून जवळपास १८ हजार दशलक्ष घन युनिट विजेची निर्मिती झाली आहे.

यावर्षी येलदरी धरणाच्या परिक्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. सात वर्षांनंतर येलदरी धरण १०० टक्के भरले. त्यामुळे ऑगस्ट महिन्यातच धरणातील पाणी नदीपात्रात सोडावे लागले. या अतिरिक्त पाण्यावर ७२ दिवस अखंडितपणे जलविद्युत प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला. त्यातून तब्बल १४ कोटी रुपयांहून अधिकचा महसूल वीजनिर्मितीच्या माध्यमातून राज्य शासनाच्या तिजोरीत जमा झाला. गेल्या ५२ वर्षांपासून अखंडितपणे सुरू असलेल्या या जलविद्युत प्रकल्पातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. तरीही उपलब्ध मनुष्यबळावर पूर्ण क्षमतेने विद्युत निर्मिती करण्याचे कसब येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दाखवले आहे.

प्रकल्पात तीन विद्युत निर्मिती संचयेलदरी प्रकल्पातील जलविद्युत केंद्रात ७.५ मेगावॉट क्षमतेचे प्रत्येकी तीन विद्युत निर्मिती संच आहेत. या तीन संचांच्या माध्यमातून २२.५० मेगावॉट वीजनिर्मिती एकाचवेळी करण्याची या केंद्राची क्षमता आहे. येलदरी प्रकल्पातून २८ डिसेंबर रोजी रब्बी हंगामासाठी पाणी सोडण्यात आले. त्यानुसार ३ पैकी २ संचांद्वारे सिद्धेश्वर धरणात पाणी सोडण्यात येणार असून, त्यातून १५ मेगावॉट वीज तयार होणार आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीyelgao damयेळगाव धरणelectricityवीज