शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबतच्या मैत्रीला ७८ वर्ष पूर्ण होताच रशियानं केली मोठी मागणी; चीनला मान्य होणार?
2
राज्यासमोर पाणीसंकट! धरणांतील पाणीसाठा ४१ टक्क्यांवर, कुठे किती पाणी शिल्लक?
3
नवा रक्तगट सापडला! १९७२ मध्ये एका महिलेच्या रक्तात कमतरता होती, गेल्या २० वर्षांपासून शोधत होते...
4
३० वर्षाची सुंदरी अन् ६० कोटींची डील..; बांगलादेशाच्या मॉडेलनं सौदीसोबतच केला कांड
5
IPL 2025: संघ हरल्यावर खरडपट्टी काढणारे संजीव गोयंका चक्क पराभवानंतरही हसले, फोटो VIRAL
6
मुर्शिदाबात हिंसाचारात हल्ला झालेले १३ जण झारखंडला पळून गेले; मारहाणीची दिली माहिती
7
हृदयद्रावक घटना! अंघोळीसाठी गेलेल्या मायलेकासह मावशीचा तापी नदीत बुडून मृत्यू
8
OYO हॉटेलमध्ये इंजिनिअरनं संपवलं आयुष्य; कहाणीत ट्विस्ट आला अन् गर्लफ्रेंडला झाली अटक
9
"महायुती सरकारने 'निवडणुकीपुरता शेतकरी आणि मतांपुरती लाडकी बहीण' अशी नवी म्हण केली रुढ’’, काँग्रेसची टीका 
10
Trigrahi Yoga 2025: शनि, शुक्र आणि बुधाची त्रिग्रही युती; 'या' पाच राशींच्या आर्थिक वाढीला देतील गती!
11
फेब्रुवारीनंतर मार्च महिन्यातही 'आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ'चा पुरस्कार भारताकडेच!
12
मोटारसायकलवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, नागपुरात रेस्टॉरंट मालकाची हत्या!
13
टॅरिफवरुन डोनाल्ड ट्रम्प सरकार धोक्यात? अमेरिकेत खटला दाखल; काय आहे प्रकरण?
14
सीएसएमटी स्थानकावर आता होणार ‘रेलमॉल’, १८ टक्के काम पूर्ण; १ हजार ८०० कोटींचा खर्च
15
खळबळजनक! सुशिक्षित कुटुंब अचानक वेड्यासारखं वागू लागलं, स्मशानभूमीतून आणली राख अन्...
16
Gold Loan व्यवसायात 'या' दिग्गज कंपनीची एन्ट्री, २०००% पेक्षा अधिक वाढलाय कंपनीचा शेअर
17
धक्कादायक! आई-बाप आहेत की शैतान, जीवापाड जपलेल्या मुलीलाच विकले
18
Walmik Karad : धनंजय मुंडेंकडून वाल्मीक कराडच्या एन्काऊंटरचा प्रयत्न; कासलेंचा गंभीर आरोप
19
IPL 2025: काव्या मारनने खेळला मोठ्ठा डाव! संघात घेतला द्विशतक ठोकणारा नवा कोरा 'बिगहिटर'
20
Mumbai: नियमांचा बट्ट्याबोळ! ट्रेड सर्टिफिकेट नाही, तरी मुंबईत टू व्हीलर विक्री जोरात

पद, पगार चांगली; तरी लाचेची हाव वाढली; राज्यात ९७ दिवसांत २१५ लाचेचे गुन्हे दाखल

By राजन मगरुळकर | Updated: April 15, 2025 13:48 IST

महसूल, भूमिअभिलेख, पोलिस, पंचायत समितीत सर्वाधिक सापळे

परभणी : नवीन वर्षात १ जानेवारी ते ७ एप्रिल या ९७ दिवसांच्या कालावधीत राज्यात लाच प्रकरणात एकूण २१२ सापळा कारवाई झाल्या, तर अपसंपदा प्रकरणात एक आणि अन्य भ्रष्टाचाराच्या दोन गुन्ह्यांची नोंद झाली. एकूण २१५ गुन्ह्यांमध्ये ३१४ लाचखोर आरोपी लोकसेवक अडकले आहेत. या कारवाईत महसूल, भूमिअभिलेख, नोंदणी, पोलिस, पंचायत समिती, सार्वजनिक आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, महापालिका आणि महावितरण विभागातील सापळ्यांचे प्रमाण दुहेरी आकड्यात आहे.

लाच देणे आणि घेणे गुन्हा असल्याचे माहीत असूनही चिरीमिरीचा मोह शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना भारी पडतो. राज्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या विविध पथकांकडून वेळोवेळी लाच प्रकरणात दाखल माहिती आणि अर्ज तक्रारीवर त्वरित गुन्हा नोंद कारवाई केली जाते. यामध्ये अगदी पाचशे रुपयांपासून ते लाखो रुपयांच्या लाचेची प्रकरणे घडल्याचे समोर आले आहे.

वर्षनिहाय सापळ्यांची संख्या (अपसंपदा, भ्रष्टाचारासह)२०१४ - १३१६२०१५ - १२७९२०१६ - १०१६२०१७ - ९२५२०१८ - ९३६२०१९ - ८९१२०२० - ६६३२०२१ - ७७३२०२२ - ७४९२०२३- ८१२२०२४ - ७२१

सापळ्यांचा आलेख घटतोयसन २०१४ ते २०२४ या कालावधीत झालेल्या एकूण सापळा कारवाईमध्ये सातत्याने दरवर्षी लाच प्रकरणातील गुन्ह्यांची नोंद घटल्याचे दिसून येत आहे. विशेषतः सन २०२० मध्ये कोरोना कालावधीत ६६३ सापळा कारवाई झाल्या होत्या. त्यानंतर पुन्हा त्यात शंभर गुन्ह्यांची वाढ झाली.

परीक्षेत्रनिहाय एकूण कारवाईमुंबई १५ठाणे २१पुणे ४०नाशिक ४५नागपूर २५अमरावती १८छत्रपती संभाजीनगर ३१नांदेड १७एकूण सापळे २१२अपसंंपदा एकअन्य भ्रष्टाचार दोनएकूण गुन्हे २१५एकूण आरोपी ३१४

अशी आहे खातेनिहाय कारवाईची संख्यामहसूल, भूमिअभिलेख, नोंदणी ५६पोलिस ३१महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कं. म. १२महापालिका १०नगरपरिषद तीनजिल्हा परिषद १०पंचायत समिती २५वनविभाग सहासार्वजनिक आरोग्य विभाग १०शिक्षण विभाग ८प्रादेशिक परिवहन विभाग पाच

गतवर्षीपेक्षा २४ कारवाई कमीसन २०२४ मध्ये जानेवारी ते एप्रिल या कालावधीत एकूण २३६ सापळा कारवाई झाल्या होत्या. यामध्ये ३४७ आरोपींचा समावेश होता. यावर्षी झालेल्या याच कालावधीतील सापळ्यांची संख्या २१२ असून, गतवर्षीपेक्षा २४ सापळे कमी झाले आहेत.

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागparabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसRevenue Departmentमहसूल विभाग