परभणी : लोकमत बालविकास मंच प्रस्तुत आणि अद्वैता स्कूल ऑफ एक्सलन्स यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या आंतरशालेय संगीत स्पर्धेला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. १८ सप्टेंबरला कृष्णा गार्डन मंगल कार्यालय येथे दोन गटांत ही स्पर्धा घेण्यात आली.
प्रारंभी ‘लोकमत’चे संस्थापक संपादक, स्वातंत्र्य संग्रामसेनानी स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रमुख पाहुणे सन्मती सेवाभावी संस्थेचे सेक्रेटरी अभय बंडेवार तर परीक्षक म्हणून लक्ष्मी लहाने, व्यंकटेश परांडे यांची उपस्थिती होती.
विजयी स्पर्धकांची नावे अशी- गट ५ वी ते ७ वी प्रथम- ओवी काजे, द्वितीय स्वरानंद परांडे, तृतीय- आयूष साळवे, उत्तेजनार्थ- वैदेही धारवाडकर, समृद्धी तिवारी.
८ ते १० वी- प्रथम- कश्यप खोब्रागडे, द्वितीय- आदिती मुंदडा, तृतीय- रिया कीर्तनकार, उत्तेजनार्थ- स्वरांजली परांडे, स्वरा बिडकर.
विजेत्यांना प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. सहभागींना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. याच स्पर्धेत राजू काजे, तिसरील विद्यार्थी अंश सोनकांबळे, साईराज मणियार यांच्यासह स्पर्धेत सहभागी नसलेले विद्यार्थ्यांनी गाणे सादर करून स्पर्धकांना प्रोत्साहित केले.