परभणी जिल्ह्यातील १४ शाळाशासनाने केल्या बंदलोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : राज्य शासनाने १० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या १२ प्राथमिक व २ खासगी माध्यमिक शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला असून याची अंमलबजावणी पुढील शैक्षणिक वर्षापासून होण्याची शक्यता आहे.राज्यात इंग्रजी शाळांची संख्या वाढत असल्याने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांना विद्यार्थी मिळणे कठीण होत चालले आहे. विशेषत: ग्रामीण भागात वाड्या-तांड्यावर याचा अधिक परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे १० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्या दृष्टीकोनातून सर्व शाळांचे शिक्षण विभागाच्या वतीने सर्व्हेक्षण करण्यात आले होते. त्यामध्ये गंगाखेड तालुक्यातील विलासनगर जि.प. शाळा (विद्यार्थी ८, कार्यरत शिक्षक २), चिलगरवाडी पाटी (विद्यार्थी ८, शिक्षक २), पांढरमाती तांडा (विद्यार्थी ८, शिक्षक २), झोला फाटा (विद्यार्थी २, शिक्षक २), महादेववाडी (विद्यार्थी १०, शिक्षक २), कांगणेवाडी (विद्यार्थी ५, शिक्षक२), जिंतूर तालुक्यातील वस्सा (विद्यार्थी ७, शिक्षक २), शहापूर वाडी (विद्यार्थी ७, शिक्षक २), पाथरी तालुक्यातील वसंतनगर तांडा, रेणापूर (विद्यार्थी १०, शिक्षक २), गणेशवस्ती बाणेगाव (विद्यार्थी ८, शिक्षक २), लक्ष्मीनगर लिंबा (विद्यार्थी ९, शिक्षक १), सोनपेठ तालुक्यातील शेळगाव तांडा (विद्यार्थी ६, कार्यरत शिक्षक २) या जि.प.च्या शाळांचा समावेश आहे. या शिवाय परभणी व गंगाखेड येथील प्रत्येकी १ खाजगी माध्यमिक शाळा बंद करण्याचा निर्णय राज्याच्या शिक्षण विभागाने घेतला आहे. त्या दृष्टीकोनातून शिक्षण विभागाकडून माहिती पाठविण्यात आली असून या शाळांवर अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे इतरत्र समायोजन केले जाणार आहे. समायोजनाची प्रक्रिया वेळखाऊ असल्याने व सद्यस्थितीत शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रियाही स्थगित असल्याने पुढील वर्षापासून या निर्णयाची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे.
परभणीजिल्ह्यातील १४ शाळाशासनाने केल्या बंदलोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : राज्य शासनाने १० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या १२ प्राथमिक व २ खासगी माध्यमिक शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला असून याची अंमलबजावणी पुढील शैक्षणिक वर्षापासून होण्याची शक्यता आहे.राज्यात इंग्रजी शाळांची संख्या वाढत असल्याने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांना विद्यार्थी मिळणे कठीण होत चालले आहे. विशेषत: ग्रामीण भागात वाड्या-तांड्यावर याचा अधिक परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे १० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्या दृष्टीकोनातून सर्व शाळांचे शिक्षण विभागाच्या वतीने सर्व्हेक्षण करण्यात आले होते. त्यामध्ये गंगाखेड तालुक्यातील विलासनगर जि.प. शाळा (विद्यार्थी ८, कार्यरत शिक्षक २), चिलगरवाडी पाटी (विद्यार्थी ८, शिक्षक २), पांढरमाती तांडा (विद्यार्थी ८, शिक्षक २), झोला फाटा (विद्यार्थी २, शिक्षक २), महादेववाडी (विद्यार्थी १०, शिक्षक २), कांगणेवाडी (विद्यार्थी ५, शिक्षक२), जिंतूर तालुक्यातील वस्सा (विद्यार्थी ७, शिक्षक २), शहापूर वाडी (विद्यार्थी ७, शिक्षक २), पाथरी तालुक्यातील वसंतनगर तांडा, रेणापूर (विद्यार्थी १०, शिक्षक २), गणेशवस्ती बाणेगाव (विद्यार्थी ८, शिक्षक २), लक्ष्मीनगर लिंबा (विद्यार्थी ९, शिक्षक १), सोनपेठ तालुक्यातील शेळगाव तांडा (विद्यार्थी ६, कार्यरत शिक्षक २) या जि.प.च्या शाळांचा समावेश आहे. या शिवाय परभणी व गंगाखेड येथील प्रत्येकी १ खाजगी माध्यमिक शाळा बंद करण्याचा निर्णय राज्याच्या शिक्षण विभागाने घेतला आहे. त्या दृष्टीकोनातून शिक्षण विभागाकडून माहिती पाठविण्यात आली असून या शाळांवर अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे इतरत्र समायोजन केले जाणार आहे. समायोजनाची प्रक्रिया वेळखाऊ असल्याने व सद्यस्थितीत शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रियाही स्थगित असल्याने पुढील वर्षापासून या निर्णयाची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे.