परभणी: जुन्या पेन्शन योजनेच्या लाभासाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने संपाची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार मंगळवारी जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय अशा एकूण ४५ विभागातील जवळपास १५ हजार आधिकारी,कर्मचाऱ्यारी संपावर गेले आहे. त्यामुळे शासकीय कार्यालयांमध्ये दिवसभर शुकशुकाट दिसून आला.
कर्मचाऱ्यांंनी ‘एकच मिशन, जुनी पेन्शन’च्या घोषणेने परिसर दणाणून सोडला. जुनी पेन्शन योजना लागू करा, सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांचे सेवा नियमित करा, सर्व रिक्त पदे अग्रक्रमाने भरा, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची पदे निरक्षित करू नका, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ द्या, यासह आदी मागण्यांसाठी जिल्ह्यातील ४५ विभागातील जवळपास १५ हजार आधिकारी,कर्मचाऱ्यारी मंगळवारी आप-आपल्या कार्यालयासमोर घोषणाबाजी करत निर्देशने केली.
तसेच जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीसमोर एकत्र आले. याठीकाणी संघटणांच्या पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. या दरम्यान ‘एकच मिशन जुनी पेन्शन’ पेन्शन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, असे कसे देत नाहीत घेतल्याशिवाय राहत नाही यासह इतर घोषणांनी परिसर दणाणून सोडला. आपल्या मागण्या शासनापर्यंत पोहचविण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे निवेदने सादर केली. या संपामुळे जिल्ह्यातील शासकीय कार्यालयातील कामे मात्र मंगळवारी दिवसभर ठप्प पडली.