परभणी : जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पहिल्या दोन तासांमध्ये ११.२७ टक्के मतदान झाले आहे.
जिल्ह्यातील ४९८ ग्रामपंचायतीमध्ये शुक्रवारी सकाळी ७.३० वाजेपासून मतदान प्रक्रियेला प्रारंभ झाला. सकाळपासूनच ग्रामीण भागात मतदारांच्या रांगा लागल्याचे पाहावयास मिळाले.
सकाळच्या टप्प्यात मतदानाचा वेग चांगला राहिला आहे. सकाळी ९.३० वाजेपर्यंत ७५ हजार ६९५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामध्ये ३२ हजार ४८९ महिला आणि ४३ हजार २०० पुरुषांचे मतदान झाले आहे.