संत तुकाराम महाविद्यालय येथील संत तुकाराम कला व विज्ञान महाविद्यालयात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कार्यक्रम पार पडला. प्रभारी प्राचार्य डॉ.शिवाजी शिराळे यांनी मनोगत व्यक्त केले. त्याचप्रमाणे शारीरिक शिक्षण संचालक प्रा.माधव कदम यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी प्रा.डॉ.शिवाजी राखोंडे, प्रा.गजानन शिंदे, डॉ.गौतम वाघमारे आदींची उपस्थिती होती. प्रा.मा.मा. कदम यांनी सूत्रसंचालन केले. अय्युब पठाण यांनी आभार मानले.
शिवाजीनगरात संगीतमय अभिवादन
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त येथील शिवाजीनगरातील राजकुमार पॅलेस येथे गीत गायन कार्यक्रमाचे आयोजन करुन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. प्रा.राजकुमार मनवर यांनी ‘भिमराया घे तुला या लेकरांची वंदना’ हे गीत सादर करुन कार्यक्रमास प्रारंभ केला. यावेळी शाहीर नामदेव लहाडे, गायिका भारती राऊत, सुनीता गायकवाड, सुनीता शिवभगत, स्मृती गायकवाड, शाहीर सिद्धार्थ प्रधान, भीमराव वाघमारे, धीरज प्रधान, राहुल प्रधान आदींनी कार्यक्रमात सहभाग नोंदविला. राहुल मोगले यांनी सूत्रसंचालन केले. शाहीर नामदेव लहाडे यांनी आभार मानले.
भीमराजा मित्र मंडळ
येथील भीमराजा मित्र मंडळाच्या वतीने सोशल डिस्टन्सचे पालन करीत डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. याप्रसंगी ६४ मेणबत्त्या प्रज्ज्वलित करण्यात आल्या. त्याप्रमाणे ६४ विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास भीमराव हत्तीअंबिरे, अक्षय नंद, कृष्णा पुंड, अमोल अवकाळे, सचिन कोरडे, वैभव वाकळे, बळी आसोरे, मंगेश सातपुते, सतीश कांबळे, सचिन नंद, सुरज नंद, अनिरुद्ध काळे, सोनू कलंबरकर आदींची उपस्थिती होती.
उबदार कपड्यांचे वाटप
येथील महापरिनिर्वाण सेवाभावी संस्थेच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त गोरगरीब नागरिकांना उबदार कपड्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी बाळासाहेब सावणे, पोलीस जमादार संभाजी पंचांगे, के.एम. राजभोज यांची प्रमुख उपस्थिती होती. शहरातील बसस्थानक, रेल्वेस्थानक, मनपा परिसर आदी भागात हा उपक्रम राबविण्यात आला.