सध्या सततच्या पावसामुळे कपाशी, तूर, हळद या पिकांमध्ये विविध कीड, रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अतिरिक्त पाण्याचा निचरा करणे तसेच पिकांमध्ये कीड, रोगाचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. त्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि रिलायन्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सद्यस्थितीतील पीक व्यवस्थापन तसेच कीड, रोग व्यवस्थापन याविषयावर चर्चासत्राचे आयोजन केले होते. यामध्ये जिल्ह्यातील साटला येथील कापूस, तूर व हळद उत्पादक शेतकरी सहभागी झाले होते. कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ.जी.डी.गडदे, विस्तार कृषी विद्यावेता डॉ. डी. डी. पटाईत व कीटकशास्त्रज्ञ उपस्थित होते. या कार्यक्रमास शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे आयोजन रिलायन्स फाउंडेशनचे जिल्हा व्यवस्थापक दीपक केकान, साहाय्यक रामाजी राऊत यांनी केले होते.
कृषी विद्यापीठ, रिलायन्स फाउंडेशनतर्फे शेतकऱ्यांना मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 4:20 AM