सध्या सततच्या पावसामुळे कपाशी, तूर, हळद या पिकांमध्ये विविध कीड, रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अतिरिक्त पाण्याचा निचरा करणे तसेच पिकांमध्ये किड, रोगाचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. त्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि रिलायन्स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सद्यस्थितीतील पीक व्यवस्थापन तसेच कीड, रोग व्यवस्थापन या विषयावर चर्चासत्राचे आयोजन केले होते. यामध्ये जिल्ह्यातील साटला येथील कापूस, तूर व हळद उत्पादक शेतकरी सहभागी झाले होते. कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ.जी.डी.गडदे, विस्तार कृषि विद्यावेता डॉ.डी.डी.पटाईत व किटकशास्त्रज्ञ उपस्थित होते. या कार्यक्रमास शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे आयोजन रिलायन्स फाऊंडेशनचे जिल्हा व्यवस्थापक दिपक केकान, सहाय्यक रामाजी राऊत यांनी केले होते.
कृषी विद्यापीठ, रिलायंस फाउंडेशनतर्फे शेतकऱ्यांना मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 4:17 AM