राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान अंतर्गत २०१५-१६ पासुन जमीन आरोग्यपत्रीका हि योजना राबवीली जाते.याअंतर्गत मृदा तपासणी वरुनच खतांची मात्रा ठरवून दिली जाते.परंतु यावर्षी कोरोनामुळे मृदा नमुना तपासणी चे काम स्थगित केले आहे.त्याऐवजी प्रत्येक तालुक्यातील १० गावात जमीन आरोग्यपत्रीका कार्यक्रम अंतर्गत प्रात्यक्षिक व प्रशिक्षण आयोजीत करून शेतकऱ्यांना जमीन आरोग्यपत्रीका बाबतचे मार्गदर्शन करण्याच्या सुचना शासनस्तरावरून दिल्या होत्या.याप्रमाणे सेलू तालूक्यातील जागतीक मृदा दिनानिमीत्त ५ डिसेंबर पासुन तालुका कृषी अधिकारी आनंद कांबळे यांनी केलेल्या नियोजनानुसार डुघरा,वाकी,सेलवाडी,बोरकीनी, पिंपळगाव गोसावी,राजा,पार्डी कौसडी या सात गावात हे प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला.या प्रशिक्षणाचा लाभ जवळपास २३३ शेतकऱ्यांनी घेतला आहे. मराठवाडा कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ ए.एम.काकडे,तालूका कृषी अधिकारी आनंद कांबळे,मंडळ अधिकारी डि.एस.तोष्णीवाल, एम.एस.डोंबे कृषी सहाय्यक शामराव पजई,बि.डी.आवटे,एस.बी.धोपटे,बि.आय.पवार,अनिल घूंबरे,बि.बी.घंटलवाड,एस.के.वारकड,सुभाष बोईनवाड,आर.ए.डोंबे यांनी या प्रशिक्षणातुन प्रामुख्याने रासायनिक खतांचा वापर कमी करून शेंद्रीय खताचा वापर वाढविणे,गांडूळ खत निर्मिती करणे यासह मृदा तपासणीवर आधारित अन्नद्रव्यांच्या कमतरतेनुसार खतांचा संतुलीत वापर करणे,खर्चात बचत करून एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापनाद्वारे पिकांच्या उत्फादकतेत वाढ करणे याबाबत कृषी तज्ञांनी मार्गदर्शन केले.
जमीनीची आरोग्य तपासणी करणे करजेचे आहे.मृदा तपासणी नंतरच आरोग्य पत्रीकानुसारच एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापन करून खताचे नियोजन करणे व अनावश्यक खर्च कमी करून जमीनीचा पोत चांगला राहील यासाठी या अभियानांचा शेतकऱ्यांना फायदा होईल.
आनंद कांबळे, तालूका कृषी अधिकारी, सेलू