जिंतूर :- तालुक्यातील डोंगरतळा येथे गावालगत असणाऱ्या गाव तलावाची पाणी पातळी अचानक वाढल्याने तलावाची पाणी गावात घुसले. परिणामी गावातील 25 ते 30 घरातील जीवन उपयोगी साहित्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. तालुका प्रशासनाने तातडीने दखल घेऊन पाणी इतरत्र वळवले आणि मोठा अनर्थ टळला
तालुक्यातील डोंगर तळा या गावालगत लघुसिंचन विभागाचा पन्नास वर्षे जुना असा गाव तलाव आहे या गाव तलावांमध्ये बारमाही पाणी साठा असतो यावर्षी झालेल्या अति पावसामुळे दिनांक 25 सप्टेंबर रोजी सकाळी सहाच्या सुमारास तलावाची पाणी गावात घुसण्यास सुरुवात झाली पाहता पाहता पाण्याचा वेग वाढल्याने गावातील 25 ते 30 घराचे तलावाचे पाणी घुसले अचानक आलेल्या पाण्यामुळे गावातील नागरिक भयभीत झाले. या संदर्भातली माहिती तालुका प्रशासनाला कळाल्यानंतर तहसीलदार सखाराम मांडवगडे, नायब तहसीलदार परेश चौधरी, तलाठी नितीन बुड्डे, ग्रामसेविका भाग्यश्री बेले यांच्यासह प्रशासनाने तातडीने गावाला भेट दिली.
तोपर्यंत गावातील 25 ते 30 घरांमध्ये पाणी शिरले होते. प्रशासनाने जेसीबीच्या साह्याने पाणी इतरत्र काढून दिले. प्रशासनाने तातडीने दखल घेतल्यामुळे मोठा धोका टळला. दरम्यान, गावांमधील आणि घरात पाणी घुसल्याने संसार उपयोगी साहित्य, धान्य, शेती उपयोगी अवजारे आदींचे मोठे नुकसान झाले आहे. शिवाय या भागातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या संदर्भात तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
तातडीने पंचनाम्याची मागणीगावांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी शिरल्याने झालेल्या नुकसानीचे प्रशासनाने तातडीने पंचनामे करावेत व शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे यासंदर्भात प्रशासनाने जास्तीत जास्त मदत द्यावी अशी मागणी सरपंच कुंडलिक जवादे यांनी केली आहे
शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसानगावात पाणी आलेच, यासोबत 100 एकरपेक्षा जास्त शेती क्षेत्राचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यासंदर्भात महसूल प्रशासनाने तातडीने मदत करणे गरजेचे आहे - गजानन पायगन, गावकरी डोंगरतळा
प्रशासनाची तत्परता, कायम स्वरूपी उपाय गरजेचायासंदर्भात सोशल मीडियाच्या माध्यमातून डोंगरतळा गावात पाणी घुसले याचे प्रशासनाला माहिती मिळताच तहसीलदार सखाराम मांडवगडे व त्यांचे पथक यांनी तातडीने डोंगरकडा या गावाला भेट देऊन त्या ठिकाणी तळ्यातील गावात येणारे पाणी इतरत्र जेसीबीच्या साह्याने काढून काढून दिले दरम्यान ही तात्पुरती व्यवस्था प्रशासनाने केली असली तरी सध्याची परिस्थिती पाहता रात्री-बेरात्री पाण्याचा प्रवाह गावकऱ्यांना मोठा धोका निर्माण होऊ शकतो यावर आता कायमस्वरूपी सिंचन विभागाने पर्याय काढणे गरजेचे आहे तसेच या तलावाची पाणी पातळी वाढविण्यासाठी गाळ काढणे ही अत्यंत महत्त्वाची आहे