लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : गंगाखेड आणि पाथरी तालुक्यातील काही भागात रविवारी वादळी वाºयासह अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने पिकांचे नुकसान झाले आहे़रविवारी दिवसभर कडक ऊन पडले होते़ मात्र सायंकाळच्या वेळी वातावरणात बदल झाला़ अचानक सोसाट्याचे वारे वाहू लागले़ पाथरी तालुक्यातील लिंबा व परिसरातील आनंदनगर तांडा, फुलारवाडी भागात दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला़ या पावसामुळे काढणीला आलेली ज्वारी, गहू, हरभरा पिकांचे नुकसान झाले आहे़गंगाखेड तालुक्यात सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास मेघगर्जनेसह पाऊस झाला़ शहर परिसरात भूरभूर पावसाने हजेरी लावली असली तरी ग्रामीण भागात काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला तर काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला़ गौंडगाव, मैराळ सावंगी, मुळी, नागठाणा, खळी, मसला, सावंगी भुजबळ, राणीसावरगाव आदी भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली़ सोनपेठ शहर व परिसरातही ५ ते १० मिनिटे हलका पाऊस झाला़पूर्णा तालुक्यामध्ये विजांचा कडकडाट होत होता़ ढगाळ वातावरण निर्माण झाले होते़ परंतु, पावसाने हजेरी लावली नाही़ परभणी शहरातही सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास जोराचे वारे वाहत होते़ वातावरणात गारवा निर्माण झाला होता़ मात्र पाऊस झाला नाही़ पालम तालुक्यातही सायंकाळी ढगाळ वातावरण निर्माण झाले होते़ दरम्यान, अचानक वातावरणात झालेल्या बदलामुळे व अवकाळी पावसामुळे शेतकºयांची धांदल उडाली़ काढून ठेवलेल्या पिकांचे नुकसानही झाले आहे़
परभणीत वादळी वाºयासह अवकाळी पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 11:56 PM