पूर्णा (परभणी) : पंधरा दिवसापासून गायब झालेल्या पावसाने गुरुवारी (दि 27) पूर्णा परिसरात जोरदार हजेरी लावली. पावसाचे तालुक्यातील चार मंडळात प्रमाण कमी होते. मात्र, पूर्णा मंडळात अतिवृष्टी झाली. काही तासांच्या कालावधीत या मंडळात 78 मीमी पर्यंत पाऊस झाला असल्याचे पर्जन्यमान अहवालातून स्पष्ट झाले आहे.
गुरुवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पावसाने अचानक हजेरी लावली. सुरुवातीस मध्यम स्वरूपात पडणाऱ्या पावसाने चांगलाच जोर धरला. सतत अडीच तासाच्या कोसळणाऱ्या सरीने जनजीवन विस्कळीत केले. मध्यरात्रीपासून शहरातील विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे. महसूल विभागाने दिलेल्या माहिती वरून पूर्णा मंडळात अतिवृष्टी झाली आहे. तालुक्याची वार्षिक सरासरी 804.40 मी मी असून तालुक्यात आत्तापर्यंत केवळ 22 .60 मिमी पावसाची नोंद झाली. गुरुवारी रात्री ते शुक्रवारी पहाटे पर्यंत पूर्णा मंडळात 78.00 मी मी पावसाची नोंद झाली आहे या तुलनेत इतर मंडळात अत्यल्प पाऊस पडला ताडकळस मंडळात 13 मी मी,चुडावा मंडळात 9 मी मी, कातनेश्वर मंडळात 13 मी मी पावसाची नोंद झाली तालुक्यातील लिमला या मंडळात मात्र पाऊस पडला नाही.