शहरं
Join us  
Trending Stories
1
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
3
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
4
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
5
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
6
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
7
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
8
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
10
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
11
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
12
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
13
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
14
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
15
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
16
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
17
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
18
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
19
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
20
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?

परभणी जिल्ह्यात शेतीच्या वादातून मारहाण; सात जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2018 12:38 AM

शेतीच्या वादातून झालेल्या मारहाणीत सात जण जखमी झाल्याची घटना येथील रेल्वे स्थानकाजवळील शेत शिवारात ५ जानेवारी रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली़ यातील दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड : शेतीच्या वादातून झालेल्या मारहाणीत सात जण जखमी झाल्याची घटना येथील रेल्वे स्थानकाजवळील शेत शिवारात ५ जानेवारी रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली़ यातील दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे़गंगाखेड रेल्वे स्थानकाजवळील शेत सर्वे नं़ २३० मधील शेतीची २२ डिसेंबर २०१७ रोजी मोजणी करण्यात आली होती़ ५ जानेवारी रोजी भूमीअभिलेख कार्यालयातील भूमापक अधिकारी एस़पी़ लाटे, साळवे, पोलीस कर्मचारी मुक्तार पठाण, खंडेराय राऊत या कर्मचाºयांनी येथील नारायणराव यादव यांच्या शेतीची हद्द निश्चित करून दिली़ यानंतर भूमापक अधिकारी व पोलीस कर्मचारी शेतातून निघून गेल्यानंतर दुपारी १२़३० ते १ वाजेच्या सुमारास नारायणराव यादव यांच्या भावकीतील काही जणांनी शेतात येऊन ज्ञानोबा यादव (४०), बाळू यादव (२८), किशनराव गिराम (५८), भागीरथीबाई गिराम (४५, सर्व रा़ गंगाखेड) , बालाजी आमले (५५), सरस्वतीबाई आमले (४५), दीपक आमले (२६, रा़ किनगाव ता़ अहमदपूर) यांच्यावर भुरकी मिरची टाकून लोखंडी गज व कुºहाडने मारहाण करून जखमी केले़ या सर्व जखमींना गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले़यातील बालाजी आमले व भगीरथीबाई गिराम यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने परभणी येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे़ या प्रकरणी सायंकाळी ७ वाजेपर्यंत गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला नव्हता़