लवकरच प्रश्न मार्गी लागेल -मलिक
दरम्यान, दुपारी २ वाजेच्या सुमारास पालकमंत्री नवाब मलिक यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे, असा ठराव घेतला जाईल. तो शासनाकडून पाठवून शिफारस केली जाणार आहे. उस्मानाबाद येथे महाविद्यालय मंजूर झाल्याने परभणीकरांमध्ये संभ्रम झाला आहे. तो आधी दूर करावा, परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करण्यासंदर्भात अनेकवेळा मंत्री मंडळाच्या बैठकीत चर्चा झाली आहे. त्यामुळे हा प्रश्न लवकरच मार्गी लागेल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
मेडिकल कॉलेज आंदोलनास पाठिंबा
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मागणीसाठी परभणीकर संघर्ष समितीने केलेल्या धरणे आंदोलनाला आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रश्नाला आपला पाठिंबा आहे. परभणी येथे शिवसेनेचा मेळावा असल्याने आंदोलन स्थळी उपस्थित राहू शकलो नाही; मात्र आंदोलनास पाठिंबा असल्याचे आ.डॉ.राहुल पाटील यांनी सांगितले.