शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

परभणीत लाभार्थ्यांनी केली नोटिसांची होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 23:52 IST

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाने लाभार्थ्यांना दिलेल्या जप्तीच्या नोटिसांची शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होळी करण्यात आली़ हडको बचाव कृती समितीच्या वतीने रिपब्लिकन सेनेचे राज्य उपाध्यक्ष विजय वाकोडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाने लाभार्थ्यांना दिलेल्या जप्तीच्या नोटिसांची शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होळी करण्यात आली़ हडको बचाव कृती समितीच्या वतीने रिपब्लिकन सेनेचे राज्य उपाध्यक्ष विजय वाकोडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले़शहरातील वांगी रोड भागात १९८४ मध्ये हडको वसाहत निर्माण करण्यात आली आहे़ ५९४ पैकी ५५२ गाळ्यांचे वाटप एससी, एसटी, मागासवर्गीय व खुल्या प्रवर्गातील लाभार्थ्यांना करण्यात आले़ २००४ पर्यंत असलेली मुदत संपली़ लाभार्थ्यांनी पैशांचाही भरणा केला़ शहरात रमाई घरकूल योजना व प्रधानमंत्री आवास योजनेसाठी लाभार्थी नाहरकत प्रमाणपत्राची मागणी करीत असतानाच म्हाडाने मात्र वसुलीसाठी नोटिसा पाठविल्या आहेत़ या नोटिसा तत्काळ रद्द कराव्यात, या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले़मुदतीत पैसे भरल्यानंतरही म्हाडा कार्यालयाकडून जाणीवपूर्वक चक्रवाढ व्याज लावून नागरिकांना वेठीस धरले जात आहे़ हा अन्याय खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा राज्य उपाध्यक्ष विजय वाकोडे यांनी दिला़ दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास नागरिकांनी हडको परिसरातून मोर्चा काढत जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात नोटिसांची होळी करुन म्हाडाचा निषेध नोंदविण्यात आला. त्यानंतर जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांची भेट घेऊन त्यांना सत्य परिस्थिती आणि झालेल्या अन्यायाची माहिती देण्यात आली. भारिप बहुजन महासंघाचे संदीप खाडे, अरुण लहाने, चंद्रकांत लहाने, आशिष वाकोडे, नीलेश डुमणे, हर्ष खिल्लारे, राजन सारणीकर, खमर फुलारी, अक्षय आदमाने, आशाताई मालसमिंदर, द्वारकाबाई गंडले, कमलबाई मुळे, मंगल खरात, लताबाई निवडंगे आदींसह लाभार्थी आंदोलनात सहभागी झाले होते़

टॅग्स :parabhaniपरभणीmhadaम्हाडा