शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात तब्बल ७,९९५ उमेदवार, सर्वच पक्षांत बंडखोरही भारंभार, १०,९०५ उमेदवारी अर्ज दाखल
2
घर फोडायचे पाप आई-वडिलांनी शिकवले नाही; शरद पवार यांची अजित पवार यांच्यावर टीका
3
आजचे राशीभविष्य: ७ राशींना आनंदी दिवस, लाभाचे योग; कार्यात यश, चांगली बातमी मिळेल
4
पोलिस-वकिलांमध्ये कोर्टातच हाणामारी; ११ वकील जखमी, पोलिस ठाण्याला आग
5
कुणाकडून कोण रिंगणात... घोळ मिटेना! जागावाटपाचा सस्पेन्स कायम; आता माघारीवर नेत्यांमध्ये होणार घमासान
6
आबांनी माझा केसाने गळा कापण्याचा प्रयत्न केला : अजित पवार
7
इस्रायलच्या हल्ल्यात गाझामध्ये ६० जण ठार; मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचे प्रमाण अधिक
8
कॅनडात टेस्ला कारचा अपघातामुळे स्फोट; नाशिकचा युवक ठार, डीएनएवरून पटली ओळख 
9
कोकण रेल्वेच्या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल; १ नोव्हेंबरपासून होणार अमंलबजावणी
10
अयोध्येत ५५ घाटांवर २८ लाख दिवे लागणार, ऐतिहासिक दीपोत्सवाचा मोठा उत्साह
11
जर्मनी, जपानमध्ये आजही का होतात बॉम्बस्फोट?
12
फक्त गणना की जातगणना? सध्या औत्सुक्याचा विषय, पण उत्तर लवकरच मिळेल 
13
सरकारकडून लोकशाही नष्ट करण्याचा प्रयत्न, प्रियांका गांधी यांचा प्रचारसभेत आरोप
14
भारत-चीन सैन्य मागे घेण्यास तयार, पूर्व लडाखमध्ये डेमचोक आणि डेपसांगवर तोडगा अंतिम टप्प्यात 
15
निदान कुलगुरुंना तरी राजकारणापासून दूर असू द्या !
16
ढोंगी लोकांच्या भुलाव्याला आपण का फसत गेलो?
17
नायजेरियन्सच्या ड्रग्ज पार्टीवर छापा, २६ लाख ७७ हजाराचे एमडी हस्तगत; २० नायजेरियनवर गुन्हा दाखल
18
हिवाळ्यात मुंबईतून रोज ९६४ विमानांच्या फेऱ्या
19
बी. फार्मसीच्या प्रवेशाला आचारसंहितेचा फटका, महाविद्यालयांची मान्यता प्रक्रिया रखडल्याने प्रक्रिया स्थगित
20
उलवेतून १ कोटीचे कोकेन हस्तगत, आफ्रिकन व्यक्तीला अटक

उत्कृष्ट कार्याचा सन्मान! राजेंद्र शिरतोडे यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर

By राजन मगरुळकर | Published: January 25, 2024 5:56 PM

परभणी ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत

परभणी : जिल्हा पोलीस दलातील ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र श्रीरंग शिरतोडे यांना राष्ट्रपती पोलीस पदक पुरस्कार जाहीर झाला आहे. उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राज्यासह देशभरात विविध तपासाची कामे सोबतच उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पोलीस कर्मचारी ते अधिकाऱ्यांपर्यंतच्या अनेकांचा सन्मान करण्यात येतो. या निमित्ताने राष्ट्रपती पदक सोबतच पोलीस महासंचालकांचे पदक आणि विविध पुरस्कार जाहीर केले जातात. परभणी ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत असलेले राजेंद्र श्रीरंग शिरतोडे यांना यंदाचा राष्ट्रपती पदक पुरस्कार जाहीर झाला आहे. राजेंद्र शिरतोडे हे परभणी पोलीस दलात मागील एक ते दीड वर्षापासून कार्यरत आहेत. त्यांनी यापूर्वी मुंबई, ठाणे, मुंबई रेल्वे, वर्धा आदी ठिकाणी कामे केली आहेत. मुंबई ब्लास्ट सोबतच वर्धा येथील उत्कृष्ट कामाबद्दल हा त्यांचा पुरस्कार जाहीर झाल्याचे समजते. दरम्यान, मागील वर्षी शिरतोडे यांना राज्याच्या पोलिस महासंचालकांचे विशेष पदक जाहीर झाले होते. त्यामुळे सलग दुसऱ्या वर्षी ते विशेष कार्याबद्दल गौरविणे जाणार आहेत. यामध्ये राज्यपालांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण आगामी काळामध्ये होणार आहे. जिल्हा पोलीस दलातील पोलीस अधीक्षक रागसुधा.आर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांनी राजेंद्र शिरतोडे यांचा उत्कृष्ट कार्याबद्दल व पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सन्मान केला.

जिल्ह्यातील दोन पोलीस ठाण्यांचे कार्य उत्कृष्टपोलीस अधीक्षक रागसुधा.आर.यांच्या हस्ते जिल्ह्यातील पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस ठाणे यांचा देखील स्थानिक कार्यक्रमात प्रशस्तीपत्र देऊन सन्मान केला जातो. यामध्ये २०२३ या कालावधीत कोतवाली आणि चारठाणा पोलीस ठाण्याने जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे पोलीस ठाणे म्हणून नावलौकिक मिळविले आहे.

या अधिकारी, कर्मचाऱ्यांची उत्कृष्ट कामगिरीजिल्हा पोलीस दलातील अधिकारी, अंमलदार यांना स्थानिक पातळीवर उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल प्रजासत्ताक दिनी प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. यामध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिवाजी गुटे, पोलीस कर्मचारी जगदीश पेंडलवार, सम्राट कोरडे, शेख मुन्नी, पोलीस कर्मचारी वसंत निळे, दत्ता चव्हाण, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक युसुफ खान मोहम्मद खान पठाण, पोलीस कर्मचारी लक्ष्मण उपलेंचवार, अर्चना रेड्डी, आशा मुसळे, रवी कटारे, शिवाजी काळे, मोहित खान पठाण, बालाजी रेड्डी, गणेश कौटकर, शेख रफीक शेख मेहताब, देवराव रखमाजी झाडे, ओमप्रकाश कोटलवार, तरन्नुम बेगम अब्दुल हरून यांचा उत्कृष्ट कार्याबद्दल सन्मान केला जाणार आहे. याशिवाय सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग भारती, पोलीस उपनिरीक्षक अजित बिरादार, रवींद्र सांगळे यांनाही गौरविले जाणार आहे.

टॅग्स :Policeपोलिसparabhaniपरभणी