परभणी : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर काही दिवसांपासून गंगाखेड विधानसभा मतदारसंघात आरोप-प्रत्यारोपांचा कलगी तुरा सुरू आहेत. गंगाखेडची जागा कोण लढणार यावरून वर्तविर्तक लावले जात असून मी पंकजा मुंडे यांच्यासाठी हा मतदारसंघ कधीही सोडायला तयार असल्याचे वक्तव्य आमदार रत्नाकर गुट्टे यांनी केले. गंगाखेड तालुक्यातील माखणीत रस्त्या विकास कामाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.
राष्ट्रीय समाज पक्षाचे गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे आणि तालुक्यातील भाजपच्या काही पदाधिकाऱ्यात गेल्या काही दिवसांपासून मतभेद झाल्याचे गेल्या काही दिवसांपासून एकमेकांवर आरोप करण्यात येत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे गंगाखेडमधून लढणार असल्याची चर्चा रंगत आहे. मुंडेंनी येथून निवडणूक लढवली तर मी त्यांना पराभूत करेल, असे वक्तव्य भाजपचे पदाधिकारी पंकजा मुंडे यांना जाऊन सांगत आहे. मात्र, यात कुठलीच सत्यता नसून पंकजा मुंडे जर गंगाखेडमधून लढणार असेल तर मी माघार घेणार असल्याचे आमदार गुट्टे यांनी स्पष्ट केले.
माझ्याविषयी पंकजा मुंडे यांच्यासह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे जिल्ह्यातील काही भाजपचेच पदाधिकारी चुकीचा गैरसमज पसरवत आहे. पण सत्य ते सत्यच असते. कुणी कितीही अपप्रचार केला तरी मला याचा फरक पडणार नाही. पंकजा मुंडे यांचा मी आदर करतो, त्या २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पडल्यानंतर त्यांच्यासाठी मी त्याच वेळी राजीनामा द्यायचा तयार झालो होता, असा टोला आ. गुट्टे यांनी विरोधकांना लगावला. मुंडे यांनी जर गंगाखेड विधानसभा निवडणुकीतून लढण्याची इच्छा व्यक्त केली तर मी निश्चित त्यांच्यासाठी काम करेल, यात काही शंका नसल्याचे ते म्हणाले.