मानवत: राज्यात महायुतीचे सरकार आल्यास अर्थसंकल्पात अधिकची तरतूद करून लाडक्या बहिणीची ओवाळणी वाढवणार तसेच पाथरी मतदार संघासाठी 4 हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देऊ असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. महायुतीचे उमेदवार राजेश विटेकर यांच्या प्रचारात 13 नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या विजयी संकल्प सभेत ते बोलत होते.
शहरातील वालीबा मळा परिसरातील मैदानावर झालेल्या सभेला उपमुख्यमंत्री अजित पवार, महायुतीचे उमेदवार राजेश विटेकर, माजी आमदार हरिभाऊ लहाने, माजी खासदार सुरेश जाधव, डॉ अंकुश लाड, पंकज आंबेगावकर, प्रताप देशमुख, एकनाथ साळवे, विलास बाबर, भावना नखाते, व्यंकटराव शिंदे, डॉ उमेश देशमुख, सुरेश भुमरे, दादासाहेब टेंगसे, किशोर ढगे यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, विरोधकांनी लाडकी बहिण योजनेला खोडा घालण्याचा प्रयत्न केला. तिजोरीवर बोजा वाढेल असे अफवा पसरून महायुती सरकारची बदनामी केली. मात्र खोट्या आरोपांना खोडून काढत सरकारने लाडक्या बहिणीच्या खात्यात तिच्या हक्काचे पैसे जमा केले. दिवसभर राब राबणाऱ्या कष्टकरी महिलांना त्यांच्या हक्काचा पैसा मिळत असताना विरोधकांच्या पोटात गोळा उठत असल्याचे सांगितले.
लाडक्या बहिणी बरोबरच अल्पसंख्यांक समाज, अनुसूचित जातीजमाती प्रवर्गासाठी महायुती सरकारने विविध योजना राबवल्या अल्पसंख्यांक समाजासाठी महायुती सरकारने एक हजार कोटीची तरतूद केली, मौलाना आझाद महामंडळाची 500 कोटी पर्यंत मर्यादा वाढवली दफनभूमी उर्दू शाळा शादी खाना यासाठी महायुती सरकारने मोठ्या प्रमाणावर निधी दिल्याचे पवार यांनी सांगितले. केंद्रातील तसेच राज्यातील महायुती सरकारने कांदा निर्यात बंदी उठवली. लाडक्या बहिणी सोबतच लाडक्या भावांसाठी विविध योजना सुरू केल्या तीन गॅस सिलेंडर मोफत दिल्याचे सांगितले.या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका सांगताना दहा टक्के जागा मुस्लिम समाजासाठी साडेबारा टक्के जागा अनुसूचित जाती प्रवर्ग, 12:30% अनुसूचित जमाती प्रवर्ग आणि साडेबारा टक्के जागा महिला उमेदवार दिल्याचे त्यांनी सांगितले. जातीपाती तेढ न करता सर्वांनी एक दिलाने राहावे अशी भूमिका अजित पवार यांनी मांडली. लोकसभा निवडणुकीत संविधान बदलण्यात येणार असल्याचे खोटे नरेटिव्ह पसरवून जनतेची दिशाभूल केल्याचे टीका अजित पवार यांनी विरोधकावर केली. या सभेत दादासाहेब टेंगसे, संजयराव रनेर यांनी राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश केला.
महायुतीचे सरकार आल्यास पाथरी मतदारसंघासाठी 4 हजार कोटी देणार संत साईबाबा यांच्या या जन्मभूमीच्या विकास आराखड्याकरीता आपण अर्थमंत्री या नात्यातून पैसा देवू. पाथरीचा कायापालट करु, तीर्थक्षेत्र नृसिंह पोखर्णीस पर्यटनाचा दर्जा देवू, तसेच पैठणच्या जलाशयातून लाभ क्षेत्रापासून कोसोदूर राहणार्या 54 गावांना सिंचनाकरीता पाणी उपलब्ध करुन देवू, गोदावरी नदीवरील बंधार्याच्या पाण्यातून पिण्यासह सिंचनाचे प्रश्न मिटवू, तसेच पाथरी मतदारसंघांतर्गत रस्ते, भूमिगत गटारे व अन्य विकास कामे मार्गी लावू, यासाठी राज्यात पुन्हा पाथरी मतदारसंघासाठी चार हजार कोटीचा विकास निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन अजित पवार यांनी यावेळी दिले . यासाठी राजेश विटेकर यांना विजयी करण्याचे आव्हान यावेळी त्यांनी केले
विद्यमान आमदारांना निधी आणता आला नाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मतदारसंघात झालेल्या रस्त्यांच्या झालेल्या अवस्थेवर बोट ठेवत याला विद्यमान आमदार जबाबदार असल्याचे सांगितले. त्यांना मतदारसंघात नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी, भेट देण्यासाठी वेळ मिळत नसतो. अडीच वर्ष सत्ता असतानाही आमदाराला काम करता आले नाही. निधी आणता आला नाही अशी टीका आ. वरपूडकर यांचे नाव न घेता केली.