पाथरी ( परभणी ) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सार्वजनिक शिवजन्मोत्सव पाथरी समितीने यावर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील देवनदारा शाळेच्या प्रांगणात १० हजार ३९२ स्क्वेअर फुट भागावर छत्रपती शिवाजी महाराजांची रांगोळीतून प्रतिमा साकारण्यात आली. ही रांगोळी पाहण्यासाठी आज दिवसभर नागरिकांनी गर्दी केली.
पाथरी शहरातील देवनांद्रा शाळेतील मैदानावर तब्बल ३४ तास अविरत परिश्रम घेतल्यानंतर ही रांगोळी साकार झाली. गुरुवारी ऐंशी टक्के रांगोळी झाली अचानक जोराचा वारा आला प्रतिमा पुसल्या गेली होती. मात्र, त्यानंतर रांगोळी कलाकार ज्ञानेश्वर बर्वे व त्यांच्या १३ सदस्यीय कलाकार चमुने मोठ्या जिद्दीने अविरत १७ तास परिश्रम घेत पुन्हा प्रतिमा साकारली. १० हजार ३९२ स्क्वेअर फूट क्षेत्रावरील या कलाकृतीसाठी तब्बल २२ क्विंटल रांगोळी लागली.
तर १७ फेब्रुवारी सायंकाळी ६ ते १८ फेब्रुवारी सकाळी ८ वाजेपर्यंतचा कालावधी ही प्रतिमा तयार करण्यासाठी लागले. यात ज्ञानेश्वरसह योगेश मगर, प्रदीप मेकेवाड, गोपाळ वडवाले, ऋषिकेश काकडे, संकेत शिनगारे, गजानन पवार, अभिषेक गायकवाड, सुरज खरात, संजना लकारे, कांचन तळेकर, सिद्धी साबू, स्नेहा बिडवे, ज्योती रन्हेर या कलाकारांनी सहभाग घेतला. रांगोळी साकारणाऱ्या कलावंताचा समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला