शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
2
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
3
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
4
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
5
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
6
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
7
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
8
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
9
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
10
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्राचा एक्झिट पोल येण्यास सुरुवात; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
11
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
12
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
13
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...
14
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी
15
IND vs AUS: शुबमन गिल संघात केव्हा परतणार? बॉलिंग कोच मॉर्कलने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
16
Fact Check: मुख्यमंत्र्यांचा फेक व्हिडिओ व्हायरल;  'लोकमत'चं नाव आणि लोगो वापरून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
17
“माझा मुलगा युद्धात लढून जिंकेल याचा अभिमान, अमितचा मोठा विजय हवा आहे”: शर्मिला ठाकरे
18
रोहित नसताना जसप्रीत बुमराहच कर्णधार! मॉर्कलच्या प्रेस कॉन्फरन्समुळे चर्चांना पूर्णविराम
19
Video - "मीरापूरमध्ये रिव्हॉल्व्हर दाखवून SHO ने मतदारांना धमकावलं"; अखिलेश यादवांचा आरोप
20
पाकिस्तानमध्ये आणखी एक दहशतवादी हल्ला; चौकी उडविली, १७ सैनिकांचा मृत्यू

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीस कारावास; परभणी न्यायालयाचा निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 6:33 PM

अल्पवयीन मुलीचा लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीस एक वर्षाचा कारावास आणि दीड हजार रुपये दंडाची शिक्षा परभणीच्या न्यायालयाने आज सुनावली.

परभणी : अल्पवयीन मुलीचा लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीस एक वर्षाचा कारावास आणि दीड हजार रुपये दंडाची शिक्षा परभणीच्यान्यायालयाने आज सुनावली.

या संदर्भात सहायक सरकारी अभियोक्ता मिलिंद गाजरे यांनी दिलेली माहिती अशी,  पीडित मुलीने ८ सप्टेंबर २०१३ रोजी या संदर्भात सेलू पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा नोंद झाला होता. माझ्यासोबत प्रेम कर, मैत्री कर, जर तू बोलली नाहीस तर मी आत्महत्या करेन व तुझ्या नावाने चिठ्ठी लिहून ठेवील, असे आरोपी लक्ष्मण प्रभाकर पौळ याने पीडित मुलीस म्हणाला. मुलीने हा प्रकार तिच्या आई-वडिलांना सांगितल्यानंतर आरोपीस समजावूनही सांगण्यात आले. मात्र त्यानंतर ८ सप्टेंबर २०१३ रोजी आरोपी पौळ याने मुलीच्या घरात घुसून तुझ्या वडिलांना जिवे मारेन, अशी धमकी दिली. या प्रकारानंतर पीडित मुलीने सेलू पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. त्यावरुन आरोपी लक्ष्मण पौळ याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. तपासी अंमलदार बी.आर. जाधव यांनी या प्रकरणाचा तपास करुन दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले.

येथील विशेष सत्र न्यायालयात हा खटला चालविण्यात आला. सहायक सरकारी अभियोक्ता मिलिंद गाजरे यांनी एकूण चार साक्षीदारांच्या जबानी नोंदविल्या. पीडित मुलगी ही घटनेच्या वेळी १८ वर्षांखालील होती. तसेच आरोपीने केलेले कृत्य हे गुन्ह्यास पात्र असल्याचा युक्तीवाद गाजरे यांनी केला. हा युक्तीवाद ग्राह्य धरुन न्या.एस.जी. ठुबे यांनी आरोपीस बाल लैंगिक अत्याचारापासून संरक्षण या कायद्याचे कलम १२ अंतर्गत एक वर्षाची शिक्षा अािण दीड हजार रुपये दंड सुनावला. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता मिलिंद गाजरे यांनी काम पाहिले.

टॅग्स :Courtन्यायालयparabhaniपरभणी