मागच्या दीड महिन्यांपासून जिल्ह्यात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. दररोज ६०० ते ७०० रुग्ण नोंद होत असल्याने सहाजिकच रुग्णवाहिका चालकांवर ताण वाढला आहे. शहरातील प्रमुख मार्गांवरून दररोज रुग्णवाहिकांच्या फेऱ्या वाढल्या आहेत. त्यामुळे दिवसभर रुग्णवाहिकेचा सायरन घोंगावत असतो. शहरात जिल्हा रुग्णालय, आय.टी.आय. रुग्णालय, जिल्हा परिषदेचे कोविड हॉस्पिटल या प्रमुख शासकीय रुग्णालयाबरोबरच खासगी रुग्णालयात रुग्णांना दाखल करावे लागते. रुग्णांची संख्या वाढल्याने रुग्णवाहिका चालकांचे ही काम वाढले आहे. शहरातील विविध वसाहतींमधून दररोज ७० ते ८० रुग्णांना दवाखान्यांमध्ये दाखल केले जात आहे. विशेष म्हणजे, नवीन रुग्णांना दवाखान्यात दाखल करण्याबरोबरच एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात रुग्णांना रेफर करण्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे या रुग्णांनाही रुग्णालयापर्यंत पोहोचविताना रुग्णवाहिका चालकांना कसरत करावी लागत आहे.
रुग्णांना दवाखान्यात भरती करणाऱ्या ॲम्बुलन्सच्या वाढल्या फेऱ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 4:18 AM