परभणी : शहरातील जास्तीत जास्त नागरिकांना आरटीपीसीआर चाचणी करता यावी, यासाठी चार ठिकाणी तपासणी शिबिरे आयोजित करण्याच्या सूचना मनपा आयुक्त देविदास पवार यांनी दिल्या आहेत.
शहरातील गांधी पार्क, सी.टी. क्लब, शिवाजी चौक आणि चिंतामणी महाराज मंदिर या ठिकाणी आरटीपीसीआर चाचणी शिबिरांचे आयोजन करावे. हा परिसर स्वच्छ करून घ्यावा तसेच आरटीपीसीआर चाचण्या करण्यासाठी लागणारे आवश्यक ते साहित्य घेऊन केंद्रांवर उपस्थित राहावे, अशा सूचनाही पवार यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत.
रेल्वेस्थानकावर तपासणीला खो
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथील रेल्वेस्थानकावर बाहेर गावाहून येणाऱ्या नागरिकांची तपासणी होत नसल्याने कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.
काही महिन्यांपूर्वी रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या तापमानाची तपासणी केली जात होती. त्याचप्रमाणे सुरुवातीच्या काळात आरटीपीसीआर तपासण्याही करण्यात आल्या. मात्र, आता या दोन्ही तपासण्यांना रेल्वे प्रशासनाने फाटा दिला आहे.