लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ग्रामीण भागात शौचालयाच्या वापराच्या अनुषंगाने केंद्र शासनाच्या पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयाच्या पथकाने १५ जानेवारी रोजी ग्रामस्थांशी संवाद साधला.पालम तालुक्यातील फरकंडा आणि गंगाखेड तालुक्यातील झोला पिंपरी या दोन गावांना या पथकाने भेट दिली. पथकप्रमुख अरुण बाकोरा, विभागीय आयुक्त कार्यालयाचे सहायक आयुक्त (विकास) अनंत कुंभार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी.पी. पृथ्वीराज, स्वच्छ भारत मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जून करडखेलकर, मुंबई येथील पाणी व स्वच्छता सहाय्य संस्थेचे विभागीय समन्वयक अरुण रसाळ, पालमचे गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर, मुशीर हाश्मी, प्रमोद टेकाळे, समूह समन्वयक विजय प्रधान, संजय पंडित, पिराज सावळे आदींची उपस्थिती होती. या भेटीदरम्यान पथकाने ग्रामस्थांशी संवाद साधत शौचालयाची सद्यस्थिती, वापराचे प्रमाण आदी विषयी विचारणा केली. तसेच ज्या ग्रामपंचायतीने स्वच्छतेचे सातत्य टिकवून ठेवले त्या ग्रामपंचायतीला केंद्र आणि राज्य शासनाचीे आर्थिक मदत मिळणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. ज्या लाभार्थ्यांनी शौचालयाचे बांधकाम केले नाही, त्यांनी ३१ जानेवारीपर्यंत बांधकाम पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
परभणीत केंद्रीय पथकाने साधला ग्रामस्थांशी संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 11:30 PM