लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : भारतीय दूरसंचार निगमचे केबल जागोजागी तुटल्याने दोन दिवसांपासून बीएसएनएलची सेवा ठप्प पडली आहे. दरम्यान, गुरुवारी दुपारी धर्मापुरी परिसरातील केबल जोडल्यामुळे काही भागातील सेवा पूर्ववत झाली.भारतीय दूरसंचार निगमच्या माध्यमातून मोबाईल तसेच इंटरनेट सेवा पुरविली जाते. जिल्ह्यात ठिकठिकाणी रस्त्याची कामे सुरु आहेत. तसेच महापालिकेची जलवाहिनी टाकण्याचे कामही अनेक भागात सुरु असल्याने त्याचा फटका मोबाईल व इंटरनेटसेवेला बसला आहे.बुधवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास परभणी शहर परिसरातील बीएसएनएलची इंटरनेट सेवा ठप्प पडली. तसेच मोबाईल सेवाही विस्कळीत झाल्याने ग्राहकांना मन:स्ताप सहन करावा लागला. मोबाईल, इंटरनेट आणि दूरध्वनीसेवाही विस्कळीत झाल्याने ग्राहक संतप्त झाले. विस्कळीत झालेली मोबाईल सेवा पूर्ववत करण्याचे काम नांदेड येथील डब्ल्यूटीआर या विभागाचे आहे. बुधवारी रात्री या विभागातील कर्मचाऱ्यांनी ठिकठिकाणी केबलची तपासणी केली; परंतु, त्यांना बिघाड सापडला नाही. त्यामुळे परभणी येथील बीएसएनएल कर्मचाऱ्यांनी गुरुवारी सकाळी बिघाड शोधण्याच्या कामाला सुरुवात केली. चार तासांच्या प्रयत्नानंतर अखेर परभणी- जिंतूर रस्त्यावरील धर्मापुरी शिवारात एका पाण्याच्या वॉल्व्हच्या खाली केबल तुटल्याचे लक्षात आले. त्यानंतर दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली. गुरुवारी साधारणत: दोन वाजेच्या सुमारास परभणी शहरातील मोबाईल व इंटरनेट सेवा पूर्ववत झाली. असे असले तरी दिवसभर इंटरनेटची गती मात्र कमी असल्याने ग्राहकांना त्रासाला सामोरे जावे लागले.अनेक ठिकाणी तुटले केबल४परभणी शहराच्या चारही बाजुंनी रस्त्याची कामे सुरु आहेत. या कामासाठी ठिकठिकाणी खड्डे खोदल्याने त्याचा परिणाम बीएसएनएलच्या सेवेवर झाला आहे. परभणी- वसमत, परभणी-पूर्णा, परभणी- जिंतूर, आणि जालना- औरंगाबाद या चारही मार्गावरील केबल तुटल्याने दोन दिवसांपासून बीएसएनएलची सेवा विस्कळीत झाली. त्यामुळे ग्राहकांना मोठा मन:स्ताप सहन करावा लागला.ग्राहक बीएसएनएल कार्यालयात४दोन दिवसांपासून मोबाईल सेवा विस्कळीत झाल्याने गुरुवारी अनेक ग्राहकांनी थेट बीएसएनएलचे कार्यालय गाठले. मात्र या ठिकाणी अधिकारी उपस्थित नसल्याने तक्रार कोणाकडे करावी, असा प्रश्न निर्माण झाला होता.४ प्रशासकीय इमारतीजवळील बीएसएनएल कार्यालयात जबाबदार अधिकारी उपलब्ध नसल्याने ग्राहकांनी संताप व्यक्त केला. विशेष म्हणजे, या ठिकाणी तक्रार रजिस्टरही उपलब्ध नव्हते. अखेर तक्रार अर्ज देऊन सेवा सुरळीत करण्याची मागणी केली.शासकीय, निमशासकीय कार्यालयातील कामकाज ठप्प४दोन दिवसांपासून बीएसएनएलची मोबाईल आणि इंटरनेट सेवा विस्कळीत झाल्याने बँक, विविध शासकीय कार्यालयांची कामे ठप्प झाल्याचे दिसून आले.४दोन दिवसांच्या या विस्कळीत सेवेमुळे मोठे नुकसानही सहन करावे लागले. दरम्यान, बीएसएनएलची सेवा यापुढे विस्कळीत होणार नाही, याची काळजी घ्यावी, अशी मागणी केली जात आहे.बुधवारी सकाळी बीएसएनएलच्या केबलमध्ये बिघाड झाला होता. त्यामुळे सेवा विस्कळीत झाली. हा बिघाड नेमका कुठे आहे, हे शोधण्याचे काम अधिकारी- कर्मचाºयांनी केले. धर्मापुरीजवळ हा बिघाड सापडल्यानंतर काही वेळातच दुरुस्ती केली असून सेवा पूर्ववत झाली आहे.-मधुकर नागरगोजे, जिल्हा व्यवस्थापक
परभणी शहरातील इंटरनेट ग्राहक त्रस्त : रस्त्याच्या कामामुळे बीएसएनएलची सेवा विस्कळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 12:02 AM