पाथरी (परभणी ) - मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाजाच्यावतीने आज दुपारी 12 च्या सुमारास तालुक्यातील ढालेगाव येथील गोदावरी पात्रात उतरून आंदोलन करण्यात आले.
पाथरी तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने 19 जुले पासून धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे, रस्ता रोको, बंद, मुंडन आंदोलन , जलसमाधी , अर्धनग्न आंदोलन , महिलांचे लाटणे, असे आंदोलन गेल्या 11 दिवसा पासून सुरू आहेत. आज मराठा समाजाच्या वतीने सकाळी 11.30 च्या सुमारास पाथरी येथून मोटारसायकल रॅली ढालेगावपर्यंत काढण्यात आली. यानंतर ढालेगाव येथील गोदावरी नदी पात्रात अर्धनग्न जल समाधी आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी शासनविरोधी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी मोठ्याप्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
पाण्यात उतरुन स्वीकारले निवेदनतहसीलदार एस.डी. मांडवडगे यांनी गोदापात्रात उतरून आंदोलकांकडून निवेदन स्वीकारले.