लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी : परभणी जिल्ह्यासाठी जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यात सिंचन आणि पिण्यासाठी पाणी सोडण्यात आले असले तरी अद्यापही पूर्ण क्षमतेने पाणी दाखल झाले नाही. मागणी १२०० क्युसेसची असताना केवळ ६०० क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे या भागात वेळेच्या आत पाणी सिंचन पूर्ण होण्यास अडचणी होणार आहेत. दरम्यान, जायकवाडी पाटबंधारे औरंगाबाद विभागाचे अधीक्षक अभियंता एस. पी. भरगुडे व यांनी मुख्य कालव्याला भेट देऊन पाणी कमी का येत आहे, याचा आढावा घेतला.परभणी जिल्ह्या यावर्षी गंभीर दुष्काळाच्या झळा सोसत आहे. पावसाचे प्रमाण ५० टक्केपेक्षा कमी राहिल्याने कोरडवाहू शेती पूर्णत: अडचणीत आली आहे. खरीप हंगामातील पिके जगविताना शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या भागातून जायकवाडी धरणाचा डावा कालवा जातो. मुख्य कालवा पाथरी तालुक्यातील वरखेडपासून १२२ कि.मी. असा सुरू होतो. दुष्काळ परिस्थितीत पाथरीसह जिल्ह्यात जायकवाडीचे पाणी मिळणे अपेक्षित आहे. आॅक्टोबर-नोव्हेंबर २०१८ मध्ये या भागात एक पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले होते. त्यानंतर या भागातील शेतकºयांनी पाणी सोडण्याची मागणी केली होती. आ. मोहन फड यांनी जलसंपदा मंत्र्यांकडे मागणी केली. त्यानंतर जानेवारी महिन्यात कालवा सल्लागार समितीच्या झालेल्या बैठकीत पाणी सोडण्याबाबत निर्णय झाला होता. जायकवाडी धरणातून डाव्या कालव्यात २३ जानेवारीपासून पाणी सोडण्यात आले आहे.२६ जानेवारी पर्यंत २०० क्युसेसने पाणी पाथरी भागात दाखल झाले. मात्र या भागात १२०० क्युसेसने पाणी सोडण्याची मागणी या विभागाडून जलसंपदा विभाग औरंगाबाद यांच्याकडे करण्यात आली होती. मागील १५ दिवसांत केवळ ५०० ते ६०० क्युसेसने या भागात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. २७ फेब्रुवारीपर्यंत पाणी राहणार असल्याची माहिती आहे.३००० हेक्टर सिंचन४जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यावर पाथरी उपविभागांतर्गत पाथरी आणि मानवत तालुक्यात या पाणी पाळीत ३००० हजार हेक्टर सिंचन झाले आहे. अद्याप १५०० हेक्टर सिंचन होणे अपेक्षित आहे. मात्र पाणी कमी क्षमतेने येत असल्याने पुढील सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला आहे.अधिकाºयांनी केली पाहणी४जायकवाडी धरणातून जिल्ह्याला सोडण्यात आलेले पाणी अगदी कमी क्षमतेने येत असल्याने जायकवाडीचे अधीक्षक अभियंता एस. पी. भरगुडेव्ह आणि कार्यकारी अभियंता सलगरकर यांनी १८ फेब्रुवारी रोजी जायकवाडीच्या मुख्य कालवाच्या पाथरी उपविभागात कॅनालला भेट देऊन याबाबत आढावा घेतला़सध्या मुख्य कालव्यात पानी कमी आहे. २ दिवसात पाणी वाढणार आहे.-खारकर, उपअभियंता पाथरी
परभणी जिल्ह्यात केवळ ६०० क्युसेसने जायकवाडीचे पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 12:54 AM